अभिताभ बच्चन, कमल हसन स्टारर ‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २७ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. तेलुगु, तमिळ, मल्याळम, हिंदी अशा विविध भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कमल हसन यांनी चित्रपट आणि कल्की चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाबाबत वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाबद्दल बोलताना कमल हसन म्हणतात- ” भारतीय चित्रपट हा जागतिक मनोरंजनाच्या व्यासपीठावर जात असल्याचे याआधी आपण पाहिले आहे आणि या वाटचालीत नाग आश्विन यांनी दिग्दर्शित केलेला ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट देखील आहे. कोणतीही धार्मिक तेढ न करता नाग आश्विनने अत्यंत काळजीपूर्वक पौराणिक कथांचा विषय हाताळला आहे. संपूर्ण जगभरातून फक्त जपान, चीन आणि ग्रीक संस्कृतीच गोष्ट सांगण्याच्या भारतीय वारशाच्या जवळ पोहोचू शकल्या आहेत. अश्विनने त्यातून कथा निवडल्या आहेत आणि सगळ्यांना एकत्र आणून खूप संयमाने हा चित्रपट साकारला आहे.”

हेही वाचा: Video: ‘मुरांबा’ मालिकेत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्याची स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’मध्ये जबरदस्त एन्ट्री! पाहा प्रोमो

पुढे सांगताना कमल हसन यांनी बीग बींचे कौतुक केले आहे. ते म्हणतात- “मला समजत नाही, या व्यक्तीला दिग्गज अभिनेता म्हणावे की या क्षेत्रात पाऊल ठेवलेला नव्या ऊर्जेचा अभिनेता म्हणावे. तितक्या ताकदीने अमिताभ बच्चन यांनी कल्की चित्रपटात काम केले आहे. असे वाटते की, हा चित्रपट लहान मुलांसाठी बनवला गेला आहे. आता हे विचारू नका, केस पांढरे झालेले लोक हा चित्रपट पाहू शकतात की नाही, चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात की नाही. कारण चित्रपट पाहताना तुमच्यातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला स्वत:मधील लहान मुलाची आठवण येणार आहे. हा एक उत्तम प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की अशा चित्रपटाचा मला भाग होता आले. हा प्रवास असाच सुरू राहणार आहे.” असे कमल हसन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कल्की हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून प्रेक्षकांनी या चित्रपटासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण भारतात ९५ कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला होता, तर जगभरात ६५ कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटात कमल हासन, अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण यांच्याशिवाय दुलकिर सलमान, मृणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडा यांनी देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalki 28 ad starer kamal haasan talking about amitabh bachchan acting in movie said i dont know he is veteran or fresh actor nsp