Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडवर जोरदार टीका केली आहे. बॉलिवूड अर्थात हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्रींचं शोषण केलं जातं असा आरोप त्यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण जोहर धर्मात्मा आहे का?

करण जोहरला मी जर चाचा चौधरी म्हटलं तर त्यात गैर काय? करण जोहर काय धर्मात्मा आहे का? मी कुणा एकाला बोलत नाही. मात्र हिंदी सिनेसृष्टीत काय घडतं ते सगळ्यांना माहीत आहे. हवाला, ड्रग्ज सगळं इथे चालतं. मी जन्मालाही आले नव्हते म्हणजेच १९८६ च्या आधी दाऊदबरोबर हिंदी सिनेसृष्टीतले लोक फिरत होते ही काय माझी चूक नाही ना? मी जे बोलते आहे त्यातून मला काय मिळालं आहे? मी काय खासदारकीचं तिकिट मिळावं म्हणून मी हे काही केलेलं नाही. आमच्या कुटुंबात माझे वडीलही काँग्रेसमध्ये होते. मी जेव्हा गँगस्टर सिनेमा केला तेव्हा काँग्रेसने मला आमदारकीसाठी उभं राहण्यासाठी तिकिट देऊ केलं होतं. असंही कंगना रणौत म्हणाल्या. न्यूज १८ लोकमतच्या चौपाल या कार्यक्रमात कंगना यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- मुंबईत २० कोटींमध्ये घेतलेला बंगला कंगना रणौत यांनी ‘इतक्या’ कोटींना विकला, कोणी केला खरेदी? जाणून घ्या

माझा सिनेमा येऊ शकला नाही म्हणून आनंद साजरा होतोय

बॉलिवूडमध्ये काय चाललं आहे? मी कष्टाने इमर्जन्सी हा सिनेमा तयार केला. हा सिनेमा रिलिज होऊ शकलेला नाही त्यामुळे अनेक लोकांना आनंद झाला आहे. अनेक लोक पार्टी करत आहेत की कंगनाचा सिनेमा आला नाही. माझं घर तोडलं गेलं तेव्हा माझी बाजू कुणीही घेतली नाही. मला एकटं पाडण्यात आलं आहे. असाही आरोप कंगना रणौत यांनी केला.

सलमान, शाहरुखसह काम केलं नाही तर आभाळ कोसळलं का?

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासह मी काम केलं नाही तर काय फरक पडतो? एक काळ असाही होता मला वाटायचं की मी यांच्याबरोबर काम करु. पण दहा वर्षांत मला अनेकदा नाकारण्यात आलं. माझं काही होऊ शकत नाही. आयटम साँग करा, कॉमेडी सीन करा असं काम मी केलं नाही. मी माझी ओळख तयार केली आहे. मला आयटम साँग नाही करायचं. सलमान खान आणि शाहरुख खान काय आहेत? त्यांच्याबरोबर नाही काम केलं तर आभाळ कोसळलं का? असाही प्रश्न कंगना यांनी उपस्थित केला. माझ्या अस्तित्त्वाभोवती मी बरी आहे असं मला वाटलं तर गैर काय?

अभिनेत्रींचं शोषण केलं जातं

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचं शोषण करणारे हेच अभिनेते असतात. डिनरला बोलवायचं, मेसेज करायचे, घरी येऊन धडकायचं. हे सगळं घडतं तुम्हाला माहीत आहे? जर सिनेमात प्रेम प्रसंग असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण सर्वात जास्त शोषण हे अभिनेते, हिरो करतात. खान असो किंवा कुमार मला कुणाची अडचण नाही. असंही कंगना रणौत म्हणाल्या.

भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी बॉलिवूडमधल्या अभिनेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. (फोटो सौजन्य-कंगना रणौत, फेसबुक पेज)

अभिनेत्रींना मुळीच आदराने वागवलं जात नाही

कोलकाता येथे बलात्कार झाला आणि डॉक्टरची हत्या झाली. किती भीषण घटना होती. मला बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या. महिलांचा समाजातही आदर होत नाही. सिनेसृष्टीही वेगळी नाही, महाविद्यालयात जर मुलगी चालली असेल तर तिच्या शरीरावर टिपण्णी केली जाते. सिनेमातले हिरो वेगळे नाही. अभिनेत्री असेल तर तिला मूर्ख आणि मंद ठरवायचं. तसंच हिरो तिला बरोबर घेऊन कुठे बाहेर गेला तर दिग्दर्शकालाही वाटतं आता ही अभिनेत्री तर माझ्याबरोबरही येईल. शोषण केलं जातं हे मी एकटीच म्हणालेली नाही. सरोज खान या आपल्या इंडस्ट्रीतल्या उत्तम कोरिओग्राफर होत्या त्याही म्हणाल्या होत्या, ‘बॉलिवूड मध्ये रेप होतात, पण रोटी म्हणजेच जेवणही देतात.’ इतक्या खालच्या पातळीवर अभिनेत्रींना वागणूक दिली जाते. त्यांना हे वाटू लागतं की बलात्कार केला तरीही माझ्या अन्नाची सोय तर केली, सोडून तर गेला नाही. अशी दुर्दशा अभिनेत्रींची झाली आहे. अशा सिनेसृष्टीत जर मी गेले आणि माझी ओळख निर्माण केली तर मला सायको ठरवलं जातं. दुटप्पी धोरण किती आहे याचंच हे उदाहरण आहे असंही कंगना म्हणाल्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut said sexual exploitation in bollywood by actors and directors scj