Madhuri Dixit and Triptii Dimri Video Viral: बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितची ओळख आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता अभिनेत्री एका नवीन भूमिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
माधुरी दीक्षितच्या या नवीन चित्रपटाचे नाव ‘माँ बहन’ असे आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेत्री तृप्ती डिमरीदेखील आहे. नुकतीच या दोन अभिनेत्री एकत्र दिसल्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तृप्ती व माधुरी एका सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसल्या. त्यांनी काही एकत्र फोटोदेखील काढले. रवी किशनदेखील त्यांच्याबरोबर पापाराझींना पोझ देताना दिसले.यादरम्यान, त्यांच्यात संभाषण होताना दिसले. माधुरीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर त्यावर लाल रंगाची ओढणी घेतली होती.तर तृप्तीने गडद निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.
आता माधुरी व तृप्तीला एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “त्या खूप सुंदर दिसत आहेत”, “हा चित्रपट गाजणार आहे”, “क्वीन”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
आता या दोन्ही अभिनेत्रींना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘माँ बहन’ हा चित्रपट आई व मुलीच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. आता माधुरी दीक्षित व तृप्तीचा हा नवीन अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अनीस बज्मी दिग्दर्शित भूल भुलैया 3 मध्ये तृप्ती आणि माधुरी यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कलाकारदेखील दिसले.
तृप्ती डिमरीच्या कामाबद्दल बोलायचे तर ती लवकरच ‘स्पिरिट’ आणि ‘ओ रोमियो’ या चित्रपटांत दिसणार आहे. याआधी ती धडक २ मध्ये दिसली होती. सिद्धांत चतुर्वेदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल यांनी केले होते आणि धर्मा प्रॉडक्शन, झी स्टुडिओज आणि क्लाउड ९ पिक्चर्स यांनी निर्मिती केली होती.
