Premium

‘आदिपुरुष’च्या प्रमोशनसाठी निर्माते खर्च करणार तब्बल ‘एवढे’ करोड रुपये; चित्रपट हिट करण्यासाठी बनवला हा ‘मास्टर प्ल्रॅन’

चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करण्यासाठी मोठी रक्कम खर्च

adipurush and kriti sanon
‘आदिपुरुष’च्या प्रमोशनसाठी होणार कोट्यावधी रुपये खर्च

साउथचा सुपस्टार प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. जसजशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे तसतशा या चित्रपटाबद्दलच्या नवनवीन गोष्टी उलगडत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video : शाहरुखचा कॅमिओ असलेला ‘टायगर ३’च्या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ लीक; पाहा भाईजान व किंग खानचा डॅशिंग अंदाज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते ‘आदिपुरुष’च्या प्री-इव्हेंटसाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च करणार आहेत. चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन व्हावे यासाठी ही मोठी रक्कम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रमोशन कार्यक्रम आणखी खास बनवण्यासाठी निर्मात्यांनी फटाके फोडणार असल्याचा दावाही केला जात आहे. या फटाक्यांसाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच २०० कोटींची कमाई केली

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच २०० कोटींची कमाई केली असल्याचं समोर आलं होतं. Tollywood.net च्या अहवालानुसार, या चित्रपटाचे तेलुगू थिएट्रिकल राइट्स पीपल मीडिया फॅक्टरीने १८५ कोटींना विकले आहेत. तर जीएसटी धरून ही रक्कम २०० कोटी होत आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने २०० कोटींच्या घरात प्रवेश केला आहे.

हेही वाचा- १६ डिग्री तापमानात शूटिंग अन् ४० तास पाणी न प्यायल्याने…; ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सांगितली भयानक परिस्थिती

हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम् या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गाणी आता प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात उत्तम कामगिरी करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 17:19 IST
Next Story
उर्वशी रौतेलाने मुंबईत खरेदी केलेल्या बंगल्याची किंमत तब्बल १९० कोटी? अभिनेत्रीच्या आईनेच सांगितलं सत्य, म्हणाली…