scorecardresearch

Premium

१६ डिग्री तापमानात शूटिंग अन् ४० तास पाणी न प्यायल्याने…; ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सांगितली भयानक परिस्थिती

‘द केरला स्टोरी’च्या चित्रीकरणादरम्यान अदा शर्माला करावा लागला कठीण परिस्थितीचा सामना

adah sharma
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माने सांगितली चित्रीकरणादरम्यानची भयानक परिस्थिती

‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत आहे. चित्रपटाने अलीकडेच २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. अलीकडेच अदा शर्माने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चित्रीकरण करताना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

अदाने फोटो शेअर करत लिहिलं आहे, “या चित्रपटाचे चित्रीकरण मायनस १६ डिग्री तापमानात करण्यात आलं होतं. तापलेलं ऊन त्यात ४० तास पाणी न प्यायल्यामुळे ओठ कोरडे पडून त्यांना भेगा पडल्या होत्या. एवढचं नाही तर जमिनीवर पडण्यासाठी खाली गादी टाकण्यात आली होती. मात्र, त्या गादीचा वापर न करता सरळ जमिनीवर पडल्यामुळे अदाच्या हाताचे कोपरे आणि गुडघ्यांना जखमा झाल्या होत्या.

हेही वाचा- Video : “माझ्या मुलांनी माझे चित्रपट पाहिलेले नाहीत, कारण…” शाहीद कपूरने केला खुलासा, म्हणाला…

अदा पुढे म्हणाली, शेवटच्या फोटोत तुम्ही बघू शकता, मी केसांना मूठ भरून नारळाचं तेल लावलं आहे आणि घट्ट वेणी घातली आहे. अदाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. हे फोटो बघून चाहते अदाने चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत आहेत.

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती या सत्यघटनेवर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पश्चिम बंगालमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. १५ ते २० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात याची चर्चा होताना दिसत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 13:03 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×