Osama bin Laden was Alka Yagnik Fan : ९० च्या दशकातील लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक त्यांच्या सुमधूर आवाजासाठी ओळखल्या जातात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत आणि त्यांच्या आवाजाचे चाहते जगभरात आहेत. ९० च्या दशकातील ‘प्लेबॅक क्वीन’ अलका याज्ञिक यांच्या आवाजाचा चाहता एक दहशतवादीदेखील होता. हा दहशतवादी म्हणजे ओसामा बिन लादेन होय. २०११ मध्ये ओसामाच्या एन्काउंटरनंतर हा खुलासा झाला. ओसामा त्यांच्या आवाजाचा चाहता आहे हे समजल्यावर अलका याज्ञिक यांनीही प्रतिक्रिया दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओसामा बिन लादेनला अमेरिकन कमांडोंनी मारलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पाकिस्तानातील घराची झडती घेण्यात आली, ज्यामध्ये गाण्यांच्या अनेक कॅसेट सापडल्या होत्या. त्यात कुमार सानू, अलका याज्ञिक व उदित नारायण यांच्या गाण्यांच्या कॅसेट होत्या. ओसामा अलका याज्ञिकचा मोठा चाहता होता, अशी माहिती सीआयएने त्यावेळी दिली होती. सलमान खान व माधुरी दीक्षितच्या गाण्यांव्यतिरिक्त ओसामाच्या आवडत्या गाण्यांमध्ये ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’चाही समावेश होता.

ओसामाच्या घरी कोणत्या गाण्यांच्या कॅसेट सापडल्या होत्या?

ओसामाच्या घरातून सापडलेल्या हिंदी गाण्यांच्या कलेक्शनमध्ये अजय देवगण आणि काजोलच्या ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातील ‘अजनबी मुझे इतना बता’ , सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘दिल तेरा आशिक’ चित्रपटाचे टायटल सॉन्ग आणि १९९४ साली आलेल्या ‘जाने तमन्ना’ सिनेमातील गाणं ‘तू चांद है पूनम का’ याचा समावेश होता.

अलका याज्ञिक यांची प्रतिक्रिया

ओसामा बिन लादेन आपला मोठा चाहता आहे हे समजल्यावर अलका याज्ञिक यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. याविषयी बोलतानाची त्यांची एक व्हिडीओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्पोर्ट्स कलेक्शनशी बोलताना ओसामाबद्दल प्रतिक्रिया देत अलका म्हणाल्या, “यात माझी चूक आहे का? ओसामा बिन लादेन कोणीही असो, तो कसाही असो, त्याच्या आत कुठेतरी एक छोटासा कलाकार असेल. त्याला माझी गाणी आवडत असतील तर हे चांगलंच आहे ना.” ओसामाच्या घरी अलका यांच्या १०० हून अधिक गाण्यांच्या रेकॉर्डिंग सापडल्या होत्या.

संगीत क्षेत्रातील राजकारण

याच मुलाखतीत अलका याज्ञिक यांनी संगीत क्षेत्रातील राजकारणाबद्दल भाष्य केलं होतं. “प्रत्येक क्षेत्रात राजकारण असते. माझ्याकडून बरीच गाणी काढून घेतली गेली. माझ्या काळातील एका व्यक्तीने माझ्याबरोबर खूप घाणेरडं राजकारण केलं होतं. मी ज्या गाण्याची रिहर्सल केली होती ते गाणं नंतर एका ज्येष्ठ गायिकेने गायलं होतं,” असं अलका म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Osama bin laden was fan of alka yagnik said is it my fault hrc