सध्या ‘आदिपुरुष’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता होती. रामायणावर आधारित हा चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील ॲक्शन सीन्स, व्हीएफएक्स यांचं नेटकरी कौतुक करत आहेत. पण हे सर्व तयार करण्यासाठी या चित्रपटावर बराच मोठा खर्च करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा टीझर पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटावर जोरदार टीका केली. या चित्रपटातील व्हीएफएक्स प्रेक्षकांना अजिबात आवडले नाहीत. सर्व बाजूंनी होणारी टीका पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आणि व्हीएफएक्समध्ये बदल करण्यासाठी आणखीन वेळ घेतला. यामुळे या चित्रपटाचं बजेट वाढलं.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

‘आदिपुरुष’ हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण ७०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. आधी या चित्रपटाचं बजेट साडेचारशे ते पाचशे कोटींच्या आसपास होतं. पण नंतर या चित्रपटाच्या व्हीएफएक्समध्ये मोठे बदल करण्यात आले. त्यामुळे या चित्रपटाचं बजेट निर्मात्यांना वाढवावं लागलं. याचबरोबर या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनीदेखील मोठं मानधन आकारलं आहे.’मीडिया रिपोर्ट’नुसार या चित्रपटामध्ये श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी प्रभासने तब्बल १५० कोटी फी आकारली आहे. तर सैफ अली खानने या चित्रपटासाठी १२ कोटी मानधन आकारलं आहे. क्रिती सेनॉनने या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी तीन कोटी फी घेतली आहे. तर हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील एक बिग बजेट चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा : Adipurush trailer: रावणाच्या लूकमध्ये मोठा बदल आणि…; ‘आदिपुरुष’चा ट्रेलर लीक, व्हिडीओ व्हायरल

या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनातील या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas and kriti sanon starrer adipurush film has a huge budget of 700 crore rnv