Priyanaka Chopra Birthday: मनोरंजनसृष्टीतील कलाकारांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. कलाकार त्यांच्या कुटुंबाबरोबर कसे राहतात, कसे वागतात याबद्दलदेखील चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. आता बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanaka Chopra)च्या पतीने तिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करीत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या पोस्टची आता चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘देसी गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्राचा आज ४२ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त प्रियांकाचा पती व अमेरिकन गायक निक जोनास याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करीत तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. निकने इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रियांकासोबतचे काही फोटो शेअर करीत, “तू स्त्री म्हणून जशी आहेस, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!” असे लिहीत त्याने प्रेममय शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

इन्स्टाग्राम

Priyanaka Chopra चे गाजलेले चित्रपट

१८ जुलै १९८२ ला जमशेदपूरमध्ये प्रियांकाचा जन्म झाला. तिचे वडील कॅप्टन डॉक्टर अशोक चोप्रा आणि आई डॉक्टर मधू चोप्रा यांनी भारतीय सैन्यामध्ये डॉक्टर म्हणून काम केले होते. तिने २००२ मध्ये तमीळ चित्रपट ‘थामिझन’मधून चित्रपटसृष्टीत आणि २००३ मध्ये हीरो : लव्ह स्टोरी ऑफ स्पाय या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘फॅशन’, ‘बर्फी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘ऐतराज’, ‘सात खून माफ’, ‘मेरी कोम’, ‘द स्काय इज पिंक’, ‘कमीने’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांतील विविध भूमिकांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या ही देसी गर्ल हॉलीवूडमध्येदेखील आपला चाहतावर्ग निर्माण करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: प्रभासच्या Kalki 2898AD चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’ला टाकले मागे, पण…

प्रियांकाचा पती निक जोनास हा अमेरिक गायक असून, तो अभिनय क्षेत्रातदेखील काम करताना दिसतो. डिसेंबर २०१८ ला या जोडीने लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वयात १० वर्षांचे अंतर असून, प्रियांका चोप्रा निकपेक्षा वयाने मोठी असल्याने त्यांच्या लग्नासंबंधी चर्चा रंगल्या होत्या. या जोडप्याला दोन वर्षांची मुलगी असून, तिचे नाव मालती, असे आहे.

दरम्यान, प्रियांका आणि निक जोनास यांनी नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्या वेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती लवकरच हॉलीवूड चित्रपट ‘द ब्लफ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याबरोबरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात आलिया भट्ट कतरिना कैफ यांच्यासोबत अभिनय करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopras husband nick jonas drop birthday post for her said i am lucky nsp