Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Launch Date: बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट आज, ३० मार्चला प्रदर्शित झाला आहे. सलमान खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानासह झळकला आहे. चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रश्मिका मंदाना कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाबरोबर पाहायला मिळाली. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरेंद्र चावला’ व ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं मुंबईतील एका रेस्टॉरंट बाहेर पाहायला मिळत आहेत. या रेस्टॉरंटमध्ये रश्मिका व विजय लंच डेटसाठी वेगवेगळे पोहोचले होते आणि डेटनंतरही वेगवेगळे रेस्टॉरंट बाहेर पडले. यावेळी रश्मिकाने पापाराझींसाठी पोज दिल्या. पण विजय थेट तोंडाला मास्क लावून पापाराझींना हॅलो करून पोज न देता निघून गेला.

लंच डेटला विजय देवरकोंडा कूल लूकमध्ये पाहायला मिळाला. विजयने पांढरा शर्ट आणि त्यावर मॅचिंग पॅन्ट घातली होती. त्याबरोबर त्याने टोपी घातली होती. तसंच रश्मिका मंदाना कॅज्युअल लूकमध्ये दिसली. क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये रश्मिका पाहायला मिळाली. रश्मिका व विजयच्या लंच डेटच्या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रश्मिका व विजय कधी प्रेमाची कबुली देतात या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक कलाकारांनी दोघं एकमेकांना डेट करत असल्याची हिंट दिली आहे. एवढंच नाहीतर दरवर्षी दोघांच्या लग्नाची अफवादेखील पसरते. ज्यावर दोघं कधीही भाष्य करत नाहीत. पण, रश्मिका व विजय नेहमी एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करत असतात. दरम्यान, ‘सिकंदर’ या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकले आहेत. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna lunch date with vijay deverakonda after released sikandar movie pps