बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘आदिपुरुष’मध्ये सैफने रावणाची भूमिका साकारली आहे. सैफ अभिनयकौशल्याबरोबरच त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखला जातो. ५३ वर्षांचा सैफ अजूनही खूप फिट आणि तरुण दिसतो. नुकताच सैफ अली खानचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील सैफच्या लूकवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी तर त्याची मलायका अरोराशी तुलना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये सैफ अली खान गुलाबी रंगाची शॉर्ट घालून घराबाहेर पडताना दिसत आहे. सैफ अली खानच्या लूकवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. ‘ही शॉर्ट सारा अली खानची आहे’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने, ही शॉर्ट करीना कपूरची असल्याचे लिहिले आहे. एवढेच नाही तर सैफच्या चालण्याच्या पद्धतीवरून अनेकांनी त्याची तुलना मलायका अरोरासोबत केली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभासने रामाची भूमिका साकारली असून, क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खान ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सामील होणार नाही. यादरम्यान सैफ पत्नी करीना कपूर व तैमुर, जेह या आपल्या मुलांसह सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जाणार आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan trolled for wearing pink shorts users compared with malaika arora dpj