शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे हा वाद निर्माण झाला. हा वाद सुरू असतानाच या चित्रपटाच्या संदर्भात बरीच माहिती समोर आली. या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी किती मानधन आकारलं यांचे आकडेही समोर आले. पण आता या चित्रपटात एक झलक दाखवण्यासाठी सलमानने किती पैसे घेतले हेही आऊट झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खानही कॅमिओ करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याची अत्यंत छोटीशी भूमिका आहे. ही छोटीशी भूमिका साकारण्यासाठी त्याने किती मानधन आकारलं हा आकडा समोर आला आहे.

आणखी वाचा : “माफी मागणं हे दरवेळी उत्तर नसू शकतं, पण…” ‘पठाण’च्या वादात शाहरुख खानच्या नव्या ट्वीटने वेधलं लक्ष

‘पठाण’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका करणार का, असं विचारल्यावर सलमान लगेचच तयार झाला होता. याचं मुख्य कारण म्हणजे त्याची आणि शाहरुखची असलेली घट्ट मैत्री. याच मैत्रीसाठी सलमानने ‘पठाण’ या चित्रपटात कॅमियो करण्यासाठी एक रुपयाही मानधन आकारलं नाही. पैशापेक्षा त्याने मैत्रीला प्राधान्य दिलं. तर दुसरीकडे या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुखने १०० कोटी, दीपिकाने १५ कोटी आणि जॉन अब्राहम याने २० कोटी रुपये मानधन आकारलं आहे.

हेही वाचा : Video: वादात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ गाण्याचं कौतुक करणाऱ्याला दीपिका पदुकोणने दिलं ‘हे’ उत्तर, व्हिडीओने वेधलं लक्ष

‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan didnt charge a single rupee to do cameo in pathaan rnv