बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीची ‘द मदर ऑफ कोरिओग्राफी इन इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोज खान आज या जगात नाहीत. पण आजही त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांना विसरलेले नाहीत. सरोज खान केवळ आपल्या नृत्यासाठीच नाही तर स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखल्या जात होत्या. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सरोज खान आणि सलमान खान यांच्यात चांगलाच वाद झाला होता. एका मुलाखतीत खुद्द सरोज खान यांनी तो किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाची उत्कृष्ट कामगिरी, अभिमान व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

सरोज खान आणि सलमान खान यांनी शेवटचे ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांनी कधीही एकत्र काम केले नाही. एकत्र काम न करण्याचे कारण सरोज खानने झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. सरोज खान ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटातील एका गाण्याचे स्टेप आमिर खान आणि सलमान खानला शिकवत होत्या. मात्र, सरोज खान यांनी फक्त आमिरलाच चांगल्या स्टेप दिल्या आहेत, असा आरोप सलमानने केला होता. यावरून सलमान इतका चिडला की त्याने सरोज खान यांना शिवीगाळही केली होती.

हेही वाचा- सौरव गांगुलीच्या बायोपिकची चर्चा; आता रणबीर कपूरऐवजी ‘या’ अभिनेत्याची लागू शकते वर्णी!

पुढे सरोज खान म्हणाल्या, सलमान माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मी टॉपचा हिरो झाल्यावर तुझ्याबरोबर काम करणार नाही. सलमानच्या या वाक्यानंतर सरोज खान यांनाही राग आला. त्यांनी सलमानला सांगितलं, मी हे सगळं स्वत:हून केलं नाही. मला दिग्दर्शक राजकुमार संतोषींनी जे सांगितलं तेच मी केलं. तुला वाईट वाटलं असेल तर मी तुझी माफी मागते. तुला माझ्याबरोबर काम करायचं नसेल तर नको करू, कारण अन्न अल्लाह देतो, तू नाही. अशा भाषेत सरोज खान यांनी सलमान खानला सुनावलं होतं.

त्यानंतर सलमान खान आणि सरोज खान यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. परंतु काही काळानंतर सरोज खान यांना बॉलीवूडमध्ये काम मिळेनासं झालं होतं तेव्हा सलमान खाननेच त्यांची मदत केली होती. दुसऱ्या एका मुलाखतीत सरोज खान यांनीच याबाबतचा खुलासा केला होता.

हेही वाचा- आमिर खान पुन्हा चित्रपटात कधी दिसणार? प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणाला, “जेव्हा माझी…”

‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. एक कल्ट क्लासिक म्हणून या चित्रपटाकडे बघितले जातं. या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, रविना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल, विजू खोटे, शक्ती कपूर अशी मोठी स्टारकास्ट होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, मात्र आजही प्रेक्षकांच्या तो लक्षात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan misbehave with saroj khan on andaz apna apna set choreographer said roti allah deta hai tu nahi dpj