बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. आमिर खान सध्या ‘चॅम्पियन’ चित्रपटाची निर्मिती करीत आहे. चॅम्पियन हा एका स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी आमिर खानने सलमान खानशी संपर्क साधला होता, मात्र आता सलमान खानने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- स्वत:चाच ‘हा’ चित्रपट पाहण्यास काजोलला आजही वाटते भीती; २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली….

बॉलीवूड हंगामाच्या बातमीनुसार, आमिर खान स्पॅनिश चित्रपट ‘कॅम्पिओन्स’चा हिंदी रिमेक बनवीत असून त्याचे नाव ‘चॅम्पियन्स’ ठेवण्यात आले आहे. सलमानला ‘चॅम्पियन’ची कथाही खूप आवडली. सलमानही जूनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याचा विचार करीत होता. पण व्यस्त वेळापत्रकामुळे सलमान खानने आमिरच्या या चित्रपटासाठी नकार दिला आहे. सलमान सध्या ‘टायगर ३’, ‘टायगर व्हर्सेस पठाण स्पाय युनिव्हर्स’ आणि ‘किक’च्या सिक्वेलमध्ये व्यस्त आहे. तो या वर्षी बिग बॉस ओटीटी २ आणि बिग बॉस सीझन १७ देखील होस्ट करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या नकारामुळे आमिरला धक्का बसला आहे आणि त्याने ‘चॅम्पियन्स’मध्ये मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूरशी संपर्क साधला आहे. रणबीरने चित्रपटाची कथा ऐकली असून त्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. २०२४ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होण्याची शक्यता आहे. रणबीरचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा- सहा महिन्यांच्या लाडक्या लेकीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; किंमत वाचून व्हाल थक्क

आमिर खानच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर तो शेवटचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर आमिर खानने काही काळ चित्रपटातून ब्रेक घेतल्याच्या बातम्या येत होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan rejected aamir khan champion film due to busy schedule dpj