Shah Rukh Khan Birthday : खलनायकाच्या भूमिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानने बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं वर्चस्व निर्माण केलं आहे. ९० च्या दशकातील किंग खानचे चित्रपट त्यामधील गाणी सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. परंतु, या सगळ्यात आणखी एक गोष्ट लक्षात राहते ती म्हणजे शाहरुख खानचं ऑनस्क्रीन नाव. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया शाहरुखच्या ऑनस्क्रीन नावामागची हटके कहाणी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : शाहरुख खान : बॉलीवूडला ‘दिवाना’ बनवणाऱ्या ‘बादशहा’च्या गाण्यांची गोष्ट

अभिनेत्याने त्याच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये एकापेक्षा-एक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु, यातील बहुतांश चित्रपटांमध्ये एक साम्य होतं ते म्हणजे शाहरुखचं ऑनस्क्रीन नाव राहुल. एक-दोन नव्हे तर तब्बल ८ चित्रपटांमध्ये अभिनेत्याचं ऑनस्क्रीन नाव राहुल असं होतं. हे आठ चित्रपट नेमके कोणते जाणून घेऊयात…

‘डर’ या १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शाहरुखने खलनायकाची भूमिका साकारली होती. यामध्ये त्याचं नाव ‘राहुल मेहरा’ असं होतं. शाहरुख खान आणि रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जमाना दीवाना’ हा चित्रपट १९९५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला यामध्ये त्याचं नाव ‘राहुल सिंग’ असं होतं.

हेही वाचा : Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री चाहत्यांची गर्दी; SRK आभार मानत म्हणाला, “मी फक्त…”

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘येस बॉस’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वेगळीच जादू केली होती. यामध्ये किंग खानने ‘राहुल जोशी’ हे पात्र साकारलं होतं. माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर आणि शाहरुख यांच्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटात अभिनेत्याने ‘राहुल’ या नृत्यदिग्दर्शकाची व्यक्तिरेखा साकारली होती.

करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ मध्ये शाहरुखचं नाव ‘राहुल खन्ना’ असं होतं. पुढे २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘हर दिल दो प्यार करेगा’ मध्येही शाहरुखने ‘राहुल’ पात्र साकारलं होतं. त्यानंतर २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात शाहरुखने ‘राहुल रायचंद’ ही अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा : Shah Rukh Khan Birthday: शाहरुखच्या आयुष्यातले ‘हे’ वाद ठाऊक आहेत? दुवा मागूनही का ठरला टीकेचा धनी?

२००१ नंतर तब्बल १२ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटात शाहरुखने पुन्हा एकदा ‘राहुल मिठाईवाला’ ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत २०० कोटींचा टप्पा गाठला होता. दरम्यान, अभिनेत्याचं ऑनस्क्रीन ‘राहुल’ नाव असलेल्या सगळ्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan birthday 8 bollywood films in which srk onscreen name was rahul sva 00