दीपिका पदुकोण व शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. काही तासांमध्ये लाखो लोकांनी ‘पठाण’चा ट्रेलर पाहिला. तर ट्रेलर पाहूनच चित्रपट सुपरहिट ठरणार असं प्रेक्षक म्हणत आहेत. दरम्यान दीपिकाच्या भगव्या बिकिनीची पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Pathaan Trailer : “चित्रपट सुपरहिट ठरणार”, शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’चा ट्रेलर पाहून भारावले प्रेक्षक, तासाभरातच मिळाले लाखो व्ह्यूज

‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर यावरुन बराच वाद रंगला. दीपिकाने या गाण्यामध्ये परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी चर्चेचा विषय ठरली. दीपिकाच्या भगव्या बिकिनीचं वादामध्ये रुपांतर झालं. तर अनेक राजकीय मंडळींनीही या वादामध्ये उडी घेतली.

चित्रपटामधून दीपिकाची भगवी बिकिनी गायब होणार असल्याच्या चर्चा आहेत. पण तात्पुरता तरी चित्रपटाच्या ट्रेलरमधून दीपिकाची भगवी बिकिनी वगळण्यात आली आहे. फक्त पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दीपिका दिसत आहे. ट्रोलिंग तसेच वादापासून दूर राहण्यासाठी भगवी बिकिनी ट्रेलरमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याच्या चर्चा आहेत.

आणखी वाचा – Pathaan Trailer : देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; शाहरुख व दीपिकाच्या बहुचर्चित ‘पठाण’चा ट्रेलर पाहिलात का?

‘पठाण’ला भगव्या बिकिनीच्या वादाचा फटका बसणार असं मध्यंतरी बोललं जात होतं. मात्र चित्रपटाच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहता हे ‘पठाण’ सुपरहिट ठरणार असं प्रेक्षक म्हणत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan deepika padukone pathaan movie trailer release actress orange bikini controversy see details kmd