scorecardresearch

Pathaan Trailer : “चित्रपट सुपरहिट ठरणार”, शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’चा ट्रेलर पाहून भारावले प्रेक्षक, तासाभरातच मिळाले लाखो व्ह्यूज

Pathaan Movie Trailer Release : दीपिका पदुकोण व शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलर तासाभरातच लाखो व्ह्यूज

Pathaan Trailer : “चित्रपट सुपरहिट ठरणार”, शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’चा ट्रेलर पाहून भारावले प्रेक्षक, तासाभरातच मिळाले लाखो व्ह्यूज
Pathaan Movie Trailer Release : दीपिका पदुकोण व शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या ट्रेलर तासाभरातच लाखो व्ह्यूज

Pathaan First Trailer Release : दीपिका पदुकोण व शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीचा वाद चर्चेत राहिला. पण या सगळ्या वादादरम्यान ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच अर्ध्या तासातच याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’च्या दोन गाण्यांमध्ये दीपिका व शाहरुखची केमिस्ट्री पाहायला मिळली. आता ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक अगदी भारावून गेले आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुख व दीपिकाचे अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. तसेच जॉन अब्राहमही यामध्ये भलताच भाव खाऊन गेला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरला तासाभरातच दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर अर्ध्यातासामध्ये हा ट्रेलर एक मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर ‘पठाण’ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत.

आणखी वाचा – Pathaan Trailer : देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; शाहरुख व दीपिकाच्या बहुचर्चित ‘पठाण’चा ट्रेलर पाहिलात का?

वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख करत असलेलं काम त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने या चित्रपटासाठी त्याच्या शरीरयष्टीवर अधिकाधिक मेहनत घेतली आहे. तर ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिकाही या चित्रपटामध्ये भाव खाऊन जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 12:00 IST

संबंधित बातम्या