Best 10 Bollywood Movies of 2024: चित्रपट, वेब सीरीज, मालिका हे मनोरंजनाची महत्वाची साधने आहेत. दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र, काही चित्रपट प्रचंड गाजतात. त्यांची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटते. आज २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अशा काही चित्रपटांबाबत जाणून घेऊ…
१. स्त्री २
श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी व राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री २’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने भारतात जवळजवळ ६०० कोटींहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
२. अमर सिंह चमकिला
अमर सिंह चमकिला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रचंड कौतुक झाले. परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
३. कल्की: २८९८ एडी
कल्की हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. तुम्ही हा चित्रपट हिंदीमध्ये नेटफ्लिक्सवर आणि तमिळ आणि तेलगूमध्ये अमेझॉन प्राइमवर पाहू शकता. नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने ७५० कोटींची कमाई केली आहे.
४. ऑल वी इमॅजिन अॅज लाइट
ऑल वी इमॅजिन अॅज लाइट हा चित्रपट पायल कपाडिया यांनी दिग्दर्शित केला होता. तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
५. चंदू चॅम्पियन
कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला चंदू चॅम्पियन या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाने ६० कोटींची कमाई केली होती.
६. फायटर
फायटर या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहेत. अनिल कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाने २०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली. फायटर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
७. शैतान
अजय देवगण आणि आर. माधवन यांची प्रमुख भूमिका असलेला हा हॉरर चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
८. मुंज्या
मुंज्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले. या चित्रपटाने जगभरात १३० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हा हॉरर कॉमेडी चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
९. क्रू
या चित्रपटात क्रिती सेनॉन, करीना कपूर आणि तब्बू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. राजेश ए. कृष्णन दिग्दर्शित हा चित्रपट हिट ठरला आणि १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला.
१०. तेरी बातों में उलझा जिया
‘तेरी बातों में उलझा जिया’हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर पाहता येईल. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसले. अमित जोशी दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात १३३.६४ कोटींची कमाई केली.
