Premium

सारा अली खानने विमानतळावरुन चोरली होती ‘ही’ वस्तू ; विकी कौशलने सांगितला मजेदार किस्सा

विकीने साराच्या एका सवयीबाबतचा किस्सा सांगितला आहे.

vicky-kaushal-sara-ali-khan
सारा अली खान विकी कौशल (संग्रहित छायाचित्र)

अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. विकी आणि सारा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. २ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान विकिने साराच्या सवयीबाबत खुलासा करत एक मजेदार किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जरा हटके जरा बचकेला मिळणारे यश साजरे करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या क्रार्यक्रमात विकी आणि साराला विचारण्यात आले की त्यांनी कधी हॉटेलच्या खोल्यांमधून सामान चोरले आहे का?. या प्रश्नावर विकीने साराचा एक किस्सा सांगितला आहे. साराला एकदा विमानतळावर १० मिनिटं झोपली होती. तिला त्या विमानतळावरची उशी एवढी आवडली की ती उशी घेऊन ती ३ राज्यांमध्ये फिरली. विमानतळावरची उशी घेऊन कोण जातं? असा प्रश्नही विकीने विचारला.

दरम्यान साराने आपली आई अमृता सिंग यांच्याशी संबंधित किस्सा सांगितला आहे. आम्ही महिनाभर सहलीला जात होतो. विमानतळावर बॅग तपासत असताना माझ्या आईच्या बॅगेचे वजन १० किलो जास्त भरले होते. साराने त्या बॅगेत शाम्पू, कंडिशनर, लोशन आणि टूथपेस्ट गोळा केली होती. त्यानंतर साराला असं न करण्याची ताकीत दिली होती.

हेही वाचा- दिलजीत दोसांझ करतोय अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टला डेट? गायकाने सोडले मौन, म्हणाला…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सारा अली खानने स्वत: कबूल केले होते की ती खूप कंजूष आहे. एका कार्यक्रमासाठी सारा अबू धाबीला गेली होती. त्यावेळी रोमिंग फीसाठी ४०० रुपये खर्च करण्याऐवजी तिने तिच्या आसपासच्या लोकांना हॉटस्पॉटसाठी विचारले होतं. ब्रूट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत साराने याबाबतचा खुलासा केला होता.

जरा हटके जरा बचके चित्रपटाने आत्तापर्यंत ३७.३६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५.४९ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाला मिळणाऱ्या यशानंतर सारा आणि विकी कौशलने सिद्धीविनायकाचं दर्शन घेत आभार मानले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 15:34 IST
Next Story
दिलजीत दोसांझ करतोय अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टला डेट? गायकाने सोडले मौन, म्हणाला…