Vivek Agnihotri Post : ‘द कश्मिर फाइल’, ‘द वॅक्सिन वॉर’, ‘द ताश्कंद फाइल्स’, ‘बुद्ध इन ट्रॅफिक जाम’, ‘मोहम्मद अँड उर्वशी’ यांसारख्या अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे विवेक अग्निहोत्री नेहमी चर्चेत असतात. राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर विवेक अग्निहोत्री कायम परखड मत मांडतात. नुकतीच त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri ) यांनी एक्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अनेक खड्डांमधून जाताना दिसत आहे. हाच व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी मार्मिक पोस्ट लिहिली आहे.

विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri ) यांनी मुख्यमंत्री शिंदेच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “मुंबईचे रस्ते. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आहे. या ताफ्यात लेक्ससपासून क्रेटापर्यंत २० आलिशान गाड्या आहेत. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सरकार भेदभाव करू शकते पण खड्डे मुख्यमंत्री आणि सामान्य माणूस यामध्ये भेदभाव करत नाहीत.” विवेक अग्निहोत्रींची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस’मध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार? निर्मात्यांकडून विचारणा झाल्याचं आलं समोर

विवेक अग्निहोत्रींच्या पोस्टवर नेटकरी काय म्हणाले?

विवेक यांच्या ( Vivek Agnihotri ) एक्सवरील या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “विवेक तुम्ही बरोबर म्हणालात. मी एक पाऊल पुढे जाऊन सांगतो. नेत्यांनी मान्य केलं आहे की, मुंबईचे खराब रस्ते हे फक्त या राज्याचेच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांसाठी निधीचे चांगले स्त्रोत आहेत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ही समस्या अशी आहे की, पावसाळा झाल्यानंतर आपण सगळेजण विसरून जाऊ. कोणीही पाठपुरावा करणार नाही.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मुंबईच्या हवामानानुसार डांबरी रस्ते अयोग्य आहेत. काँक्रिटचे रस्ते हा एक उत्तम पर्याय आहे.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : अंकिता, धनंजय यांना अजूनही अभिजीत सावंतवर आहे डाउट, गॉसिप करताना म्हणाले, “आपलंच नाणं खोटं…”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील रस्त्याची पाहणी केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा खड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जाताना दिसत आहे. ठाणे-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद मार्गांसह प्रमुख महामार्गावरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.