Irrfan Son Babil Khan Cryptic Post : इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान काही महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता. जेव्हा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हापासून बाबिलने सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले आहे, सार्वजनिक कार्यक्रमांनाही टाळले आहे. पण, ११ ऑक्टोबर रोजी बाबिल बऱ्याच दिवसांनी इन्स्टाग्रामवर परतला आणि त्याने नैराश्याशी लढा देण्याबद्दल एक पोस्ट शेअर केली.
बाबिल खान चार महिन्यांनंतर इन्स्टाग्रामवर परतला. त्याने स्वतःचे काही फोटो शेअर केले आणि एक नोट लिहिली, ज्यामध्ये त्याने नैराश्याशी केलेला संघर्ष आणि त्याची सध्याची स्थिती सांगितली. काही महिन्यांपूर्वी बाबिलचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो खूप रडत होता आणि त्याने दावा केला होता की, त्याला बॉलीवूडमध्ये बाजूला करण्यात आले आहे. त्याशिवाय बाबिलने व्हिडीओमध्ये बॉलीवूडवरही आपला राग व्यक्त केला होता, ज्यामध्ये त्याने अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, अर्जुन कपूर, शनाया कपूर व आदर्श गौरव यांना लक्ष्य केले होते.
आता बाबिल खानने चार महिन्यांनंतर पोस्ट केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले, “मला ऐकायचे नव्हते. या काचेच्या घराच्या भिंती पातळ आहेत. मी माझे हृदय उघडे ठेवले आणि आता माझा टी-शर्ट रक्ताने माखला आहे. मला बरे होण्यासाठी वेळ हवा होता. मला झोप येत नव्हती, मी घाबरायचो आणि त्या भीतीमुळे मला विचित्र गोष्टी कबूल करण्यास भाग पाडले. मी मदतीसाठी ओरडत होतो. मी माझ्या भावना दाबून ठेवू शकत नव्हतो. त्या गोष्टी माझ्या आरोग्यावर परिणाम करीत होत्या. मी कंटाळलो होतो. मी माझ्या नैराश्याशी झुंजत होतो.”
बाबिल खानच्या पोस्टवर चाहत्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत आणि त्यांनी अभिनेत्याला प्रोत्साहन दिले आहे. अभिनेता विजय वर्मा यांनीही त्याला प्रोत्साहन दिले, “बाबिल, तू आम्हाला परत भेटला आहेस,” असे लिहिले. अपारशक्ती खुरानाने, “भाऊ”, असे लिहिले आणि त्यानंतर हार्ट इमोजी टाकला. गुलशन देवैय्याने “बघा कोण आले आहे”, असे लिहून बाबिलला प्रोत्साहन दिले.
तो भावनिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाबिल खानने साई राजेशचा चित्रपटही सोडला. एका निवेदनात, बाबिलने सांगितले की, तो ब्रेक घेत आहे आणि भविष्यातील प्रोजेक्टवर साई राजेशबरोबर काम करण्यास परत येईल.