बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तर तिचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वीच मलायकाच्या कारला अपघात झाला. त्यानंतर आता मलायका पुन्हा एकदा सेटवर परतली आहे. त्याचा फोटो नुकताच मलायकाने शेअर केला आहे.
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. मलायकाने शेअर केलेल्या या फोटोत तिने पाय दाखवला आहे. मलायकाचा जेव्हा अपघात झाला तेव्हा तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. हा फोटो शेअर करत पुन्हा एकदा सेटवर परतल्यावर खूप बरं वाटतं असे कॅप्शन तिने दिले आहे.
आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video
दरम्यान मलायका अरोराचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. पुण्यातील एका फॅशन इव्हेंटमधून मुंबईला येत असताना तीन गाड्यांच्या झालेल्या अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २ एप्रिलला मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल प्लाजाजवळ ही दुर्घटना घडली होती.
आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार
या अपघातानंतर मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर तिची काळजी घेताना दिसला होता. मलायकाला भेटण्यासाठी बॉयफ्रेंड अर्जुन कपूर तिच्या घरी पोहोचला होता. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत होता. मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचं तर दोघंही मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. त्यांनी आपलं नातं सर्वांसमोर खुलेपणानं मान्य केलं आहे. मलायका अर्जुनपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. मलायका अरोरा २०१७ मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करत आहे.