scorecardresearch

भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

salman khan, salman khan viral video,
सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

काल बाबा सिद्दीकी यांच्या घरी इफ्तार पार्टी होती. बाबा सिद्दीकी दरवर्षी इफ्तार पार्टी करतात. त्यांची इफ्तार पार्टी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खानपासून सलमान खानपर्यंत त्यांच्या इफ्तार पार्टीला अनेकांनी हजेरी लावली. यादरम्यान, सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. यात सलमानसोबत बाबा सिद्दीकी दिसत आहेत. पण हा व्हिडीओ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत बुरखा घातलेली एक महिला गर्दीत सलमानसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. फोटो काढत असताना बाबा सिद्दीकी यांनी सलमानला त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. ते सलमानला गर्दीतून पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते, पण सलमान थांबला आणि त्या महिलेसोबत फोटो काढल्यानंतर तो पुढे गेला.

आणखी वाचा : ‘कधीच कोणता टॅटू काढू नका…’, पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यसाठी समांथाने काढले होते तीन Tattoo

आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार

आणखी वाचा : “वजन थोडसं वाढलयं…”, प्राजक्ता माळीच्या बोल्ड फोटोशूटवर नेटकऱ्यांनी केल्या मजेदार कमेंट

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “अरे इतकी घाई का आहे, फोटो तर काढू द्दा.” दुसरा नेटकरी म्हणाला, “सलमान भाई त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही.” बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत जरीन खान, शहनाज गिल, प्रतीक सहजपाल यासारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman was taking selfie with salman khan baba siddique dragged the actor watch viral video dcp

ताज्या बातम्या