scorecardresearch

३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार

२४ जानेवारी २०२० पासून शनि मकर राशीत बसला आहे. गेल्या वर्षी शनीने आपली राशी बदलली नाही. पण या वर्षी २९ एप्रिलला शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

shani, Rashi bhavishya,
पण या वर्षी २९ एप्रिलला शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

शनि संक्रमण २०२२ : शनी ग्रह हा सर्वात संथ पारगमन करणारा ग्रह मानला जातो. या ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच ते तीन वर्षे लागतात. २४ जानेवारी २०२० पासून शनि मकर राशीत बसला आहे. गेल्या वर्षी शनीने आपली राशी बदलली नाही. पण या वर्षी २९ एप्रिलला शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिचे भ्रमण सुरू होताच ४ या राशींचे भाग्य उजळेल.

वृषभ (Taurus) : या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्तम सिद्ध होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. मानसिक ताण कमी होईल. जुने वाद मिटतील. आर्थिक अडचणी दूर होतील. प्रवासाचे शुभ योग दिसत आहेत. एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असणार आहे.

आणखी वाचा : “वजन थोडसं वाढलयं…”, प्राजक्ता माळीच्या बोल्ड फोटोशूटवर नेटकऱ्यांनी केल्या मजेदार कमेंट

मिथुन (Gemini) : या राशीच्या लोकांना शनिच्या धैयापासून मुक्ती मिळेल. त्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास घेऊ शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला कामामध्ये बढती मिळू शकते. कर्जाची पुर्तता करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायाचा विस्तार होईल. या काळात मोठी डील फायनल होऊ शकते.

आणखी वाचा : आर माधवनच्या मुलाने परदेशात भारताचे नाव उंचावले, मुलाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेता, म्हणाला…

तूळ (Libra) : या राशीच्या लोकांनाही शनीच्या धैयापासून मुक्ती मिळेल. हा काळ तुमच्यासाठी आनंद आणेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीचीही दाट शक्यता आहे. एखाद्या जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. मानसिक समस्या कमी होतील.

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींचे स्टायलिश मंगळसूत्र पाहिलेत का?

धनु (Sagittarius) : शनीची राशी बदलताच धनु राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. शनिदेवामुळे तुमच्यासाठी रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अनेक पटींनी चांगली होईल. तुम्ही प्रवासातूनही चांगले पैसे कमवू शकाल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After 30 years shani will enter in kumbh rashi know its effects dcp