छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत सर्वांच लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : खेकडा खायला शिकविणारी स्पृहा जोशी ‘या’ कारणाने ट्रोल; नाराज नेटकरी म्हणाले, “तुला अनफॉलो…”

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनंख गेल्या कित्येक वर्षांपासून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. या म्युझियमशी महाराष्ट्र सरकार करार करणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. याबाबत आता नाना पाटेकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावला आहे. “मुनगंटीवार महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन…जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा…” असं नानांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : अखेर मल्हारसमोर येणार स्वराज मुलगी असल्याचं सत्य; ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो…

अभिनयाबरोबरच नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर नेहमीच ते आपलं मत मांडत असतात. नेटकऱ्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : ‘बाजीगर’मधील शाहरुखची भूमिका बऱ्याच लोकांनी का नाकारली? दलिप ताहील यांनी सांगितलं यामागील कारण

एका युजरने, “वा…नानासाहेब जनतेच्या मनातील बोलले” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने, नानांनी रास्त मागणी केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar advise to minister sudhir mungantiwar about bringing back chhatrapati shivaji maharaj waghnakh sva 00