“कंगना रणौत उत्कृष्ट निर्माती, पण तिच्या विचारांशी मला देणं घेणं नाही : नवाजुद्दीन सिद्दीकी

कंगना गेल्या काही दिवसांपासून ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त आहे.

आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. नवाजुद्दीन हा नेहमीच त्याच्या स्पष्टवक्तापणासाठी ओळखला जातो. तो सध्या कंगना निर्मिती करत असलेल्या ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

नुकतंच नवाजुद्दीन सिद्दीकीने न्यूज १८ इंडिया या प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. यावेळी त्याला टिकू वेड्स शेरु या चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने कंगना रणौतबद्दल तुझे मत काय असा प्रश्न विचारला. त्यावेळी तो म्हणाला, “मी सध्या कंगना निर्मित करत असलेल्या टिकू वेड्स शेरु या चित्रपटात काम करत आहे. ती एक प्रेम कहाणी आहे.”

“कंगना रणौत ही एक उत्कृष्ट निर्माती आहे. ती निर्मित करत असलेल्या चित्रपटाची कथा मला आवडली. पण माझा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि तिच्या विचारांशी काहीही संबंध नाही,” असेही नवाजुद्दीने सांगितले.

या कार्यक्रमात बोलताना नवाजुद्दीने म्हणाला, “मी खऱ्या आयुष्यात कधीही रोमान्स केला नाही. याच कसर मी आता रोमँटिक चित्रपट करत भरुन काढतो आहे. मला शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करण्याची इच्छा होती. जी पूर्ण झाली आहे.”

हेही वाचा : कंगना रणौतची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, जाणून घ्या काय आहे खास?

दरम्यान ‘थलायवी’ या चित्रपटाच्या यशानंतर कंगना ही निर्मिती क्षेत्रात तिचे नशीब आजमावताना पाहायला मिळत आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगना ही निर्माती म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. कंगना निर्मिती करत असलेल्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘मणिकर्णिका फिल्म्स’द्वारे केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawazuddin siddiqui on kangana ranaut like her scripts but nothing to do with her thoughts nrp

Next Story
कतरिनाने दिले नाही सलमानच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमंत्रण? अर्पिताने केला खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी