Entertainment News Today, 4 May 2025 : बॉक्स ऑफिसवर सध्या रितेश देशमुख व अजय देवगण यांच्या ‘रेड २’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. तर, २५ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या इमरान हाश्मीच्या ‘ग्राऊंड झिरो’ या सिनेमाची देखील सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे जाणून घेऊयात. याशिवाय मराठी मनोरंजन विश्वातील इतर घडामोडी जाणून घ्या…
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
अखेरचे काही दिवस…; ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका बंद होणार, अभिनेत्रीने शेअर केला सेटवरचा व्हिडीओ
रेखा यांनी सिनेमाच्या सेटवर सगळ्यांसमोर ‘या’ अभिनेत्रीच्या लगावली होती कानशिलात, अन् मग…
‘स्त्री २’ च्या यशानंतर श्रद्धा कपूरने वाढवलं मानधन, एकता कपूरच्या चित्रपटासाठी घेणार तब्बल ‘इतके’ कोटी…
Ground Zero Box Office Collection Day 9 : इमरान हाश्मीचा ‘ग्राऊंड झिरो’ चित्रपट २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई केलेली नाही.
इमरान हाश्मी व मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ग्राऊंड झिरो’ सिनेमाने गेल्या ९ दिवसांत फक्त ८.३ कोटींची कमाई केली आहे. २००१ मध्ये झालेल्या काश्मीर येथील घटनेवर हा चित्रपट आहे. यामध्ये इमरानने बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ दुबे यांची भूमिका साकारली आहे.
सई ताम्हणकर-समीर चौघुलेंच्या ‘गुलकंद’ सिनेमाची दणक्यात सुरुवात! ३ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी…
“बॉलीवूड खूप वाईट…” इरफान खान यांचा लेक बाबिलचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “काहींची अशी इच्छा आहे की…”
प्रिया सपशेल फेल! अर्जुनने ‘ती’ चूक पकडली अन् तिची बोलती झाली बंद; मानसोपचार तज्ज्ञांसमोर काय बरळणार? पाहा प्रोमो…
“तो अशा मित्रांना कास्ट करतो ज्यांच्याकडे…”, सलमान खानचे चित्रपट फ्लॉप होण्याचं कारण काय? लोकप्रिय अभिनेता म्हणाला…
लग्नानंतर २ वर्षांनी लोकप्रिय मराठी अभिनेता झाला बाबा! मुलाचं नाव ठेवलंय खूपच खास; अर्थ सांगत म्हणाला, “महादेवाच्या कृपेने…”
Bigg Boss फेम जान्हवी किल्लेकरने घेतली आलिशान गाडी! कुटुंबासह केली पूजा, नव्या गाडीची किंमत किती?
शाहरुख-कियारानंतर ‘हा’ कलाकार ‘मेट गाला’मध्ये करणार पदार्पण, सोशल मीडियावर दिली माहिती
मे महिन्यात मनोरंजनाचा धमाका; ‘हे’ नऊ जबरदस्त चित्रपट आणि वेब सीरिज होणार प्रदर्शित…
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने ९ दिवसांत वर्ल्डवाइड एकूण १.२६ कोटींची कमाई केल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. यामध्ये सूरज चव्हाण, जुई भागवत, हेमंत फरांदे, इंद्रनील कामत या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Raid 2 Box Collection Day 3 Updates – रितेश देशमुख व अजय देवगणच्या ‘रेड २’ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ३ दिवसांत ४९.२५ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा गुरुवारी ( १ मे ) प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने शनिवारी सर्वाधिक कमाई चेन्नईमध्ये केली आहे.
पहिला दिवस ( गुरुवार १ मे ) – १९.२५ कोटी
दुसरा दिवस – १२ कोटी
तिसरा दिवस – १८ कोटी
एकूण कलेक्शन – ४९.२५ कोटी
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड 2’ मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक हे कलाकार आहेत.