लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईः गोरेगाव पूर्व येथे १४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरणही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

गोरेगाव पूर्व आगार येथील ट्रक स्टॅन्डच्या मागे हा प्रकार घडला. पीडित मुलगा २ मे रोजी घटनास्थळी असताना आरोपी मुले तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करून जबरदस्तीने त्याला तेथील ट्रक स्टॅन्डच्या मागे नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचे चित्रीकरण केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने याबाबत कोणालाच काही सांगितले नाही. अखेर त्याने याप्रकरणी दिंडोशी पोलिसांकडे तक्रार केली.

हेही वाचा… मुंबई: महारेराकडून आता सुरुवातीपासूनच प्रकल्पावर नजर!

त्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिडोशी पोलिसांनी या प्रकरणी १८ व १९ वर्षांच्या दोन मुलांना अटक केली. तसेच या गुन्ह्यात १५ वर्षे व १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलांचाही समावेश असून त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 14 year old boy was filmed during unnatural abuse case filed against 4 people in mumbai print news dvr