Mumbai Local Mega Block: मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी, १८, २२, २३ आणि २४ सप्टेंबर रोजी विशेष वाहतूक आणि पाॅवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत ते खोपोली, नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येतील.

ओव्हर हेड वायरची कामे, पोर्टल उभारणी, तोडणे, अँकर शिफ्टिंग, लोड ट्रान्सफर आणि नवीन क्रॉसिंग पॉइंट्ससाठी ब्लाॅकची मालिका निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि लोकल सेवेवर परिणाम होईल.

१८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १:३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लाॅक कालावधीत कोइम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस सकाळी ११.३० ते दुपारी १.०५ पर्यंत लोणावळा येथे थांबवण्यात येईल. चेन्नई-अहमदाबाद हमसफर एक्स्प्रेस आणि चेन्नई-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस पुणे विभागात थांबवण्यात येईल. दुपारी १.१० नंतर लोणावळा येथून पुढील मार्गासाठी मार्गस्थ होतील. या ब्लॉक काळात नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात येईल.

डाऊन लोकल रद्द

  • दुपारी १२ वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द करण्यात येईल.
  • दुपारी १.१५ वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द करण्यात येईल.

अप लोकल रद्द

  • सकाळी ११.२० वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द करण्यात येईल.
  • दुपारी १२:४० वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द करण्यात येईल.

डाऊन लोकल अंशतः रद्द

सीएसएमटीहून सकाळी ९:३० ते सकाळी ११.१४ पर्यंत कर्जतला जाणाऱ्या लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील. तर, या लोकल नेरळ ते कर्जत दरम्यान रद्द राहतील.

अप लोकल अंशतः रद्द

कर्जतहून सकाळी ११.१९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल नेरळ येथून सुटतील. या लोकल कर्जत ते नेरळ दरम्यान रद्द केल्या जातील.

सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२.२५ ते दुपारी १.५५ वाजेपर्यंत कर्जत अप मार्गिकेवर (यार्डसह) ब्लॉक असेल. ब्लॉक काळात कर्जत ते खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नाहीत.

डाऊन लोकल रद्द

  • दुपारी १.१५ वाजता कर्जतहून खोपोलीला जाणारी लोकल रद्द राहील.

अप लोकल रद्द

  • दुपारी १२:४० वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द राहील.

मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वे मार्गावर (अप यार्डसह) सकाळी ११.२० ते दुपारी १.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

डाऊन लोकल रद्द

  • दुपारी १२ वाजता कर्जतहून खोपोलीला जाणारी लोकल रद्द राहील.
  • दुपारी १.१५ वाजता कर्जतहून खोपोलीला जाणारी लोकल रद्द राहील.

अप लोकल रद्द

  • सकाळी ११.२० वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द राहील.
  • दुपारी १२:४० वाजता खोपोलीहून कर्जतला जाणारी लोकल रद्द राहील.

बुधवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० ते दुपारी १.२० आणि दुपारी १.२० ते दुपारी ३.२० पर्यंत अप, डाऊन आणि मध्य मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.