मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील पायाभूत कामांसाठी ब्लाॅक घेण्यात येतो. तसेच ब्लाॅक काळात सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर, रेल्वे रूळ यांची देखभाल-दुरूस्ती केली जाते. येत्या रविवारी मेगाब्लाॅक घेऊन मुख्य आणि हार्बर मार्गावर देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्लाॅक कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तसेच मुख्य मार्गावरील लोकल विलंबाने धावतील. ब्लाॅक काळात पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी ११.०५ पासून दुपारी ३.४५ पर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून त्या त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने इच्छित स्थानकात पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.
हार्बर मार्ग
कुठे : कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : रविवारी सकाळी ११.१० पासून दुपारी ४.१० पर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ पासून दुपारी ३.३६ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.१६ पासून दुपारी ३.४७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल – वाशी मार्गादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० पासून सायंकाळी ६ पर्यंत ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १०.३५ पासून दुपारी ३.३५ पर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत चर्चगेट – मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील सर्व जलद लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, चर्चगेटला जाणाऱ्या काही लोकल वांद्रे, दादर स्थानकांपर्यंत चालवण्यात येतील. त्यानंतर ही लोकल सेवा अंशत: रद्द केली जाईल.