मुंबई : राज्यात वळिवाच्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद ‘सिंधुदुर्ग’ जिल्ह्यातील ‘सावंतवाडी’ येथे झाली. तेथे १३० मिमी पावसाची नोंद झाली.

सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. मंगळवारी मात्र पावसाने अनेक भागात जोर धरला. काही भागात संपूर्ण दिवसभर कोसळला. तर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सायंकाळनंतर दमदार हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी पाणीही साचले होते. दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ वातावरणात चक्रीय स्थिती तयार झाली असून आज सायंकाळपर्यंत तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (२३ मे) सकाळपर्यंत या क्षेत्राची तीव्रता वाढून डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे.

अरबी समुद्रातील डिप्रेशनचा कोकण किनारपट्टीला समांतर प्रवास होणे अपेक्षित असल्याने पुढील ३ ते ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यांसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्याच्या काही भागात पुढील काही दिवस पडणारा पाऊस हा वळिवाचा पाऊसच आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

मंगळवार सकाळी ८:३० ते बुधवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत झालेली पावसाची नोंद (जिल्हानिहाय)

रत्नागिरी

खेड- ५९ मिमी

मंडणगड- २२ मिमी

दापोली – ४६ मिमी

वाकवली- ३८ मिमी

गुहागर – २७ मिमी

देवरुख – ९५ मिमी

चिपळूण – ५५ मिमी

राजापूर – २५ मिमी

लांजा- ५५ मिमी

रायगड

मुरुड- ७५ मिमी

पेण-२७ मिमी

पनवेल – २९.२ मिमी

उरण- ० मिमी

कर्जत -१७.२ मिमी

खालापूर -७२ मिमी

माथेरान – ५६ मिमी

सुधागड – ३८ मिमी

माणगाव – ६९ मिमी

तळा-४६ मिमी

महाड-१८ मिमी

पोलादपूर – ५२ मिमी

श्रीवर्धन – ६८ मिमी

म्हसळा- ५० मिमी

रोहा- ७८ मिमी

सिंधुदुर्ग

मालवण- ११४ मिमी

कुडाळ – ७५.५ मिमी

कणकवली – ५८ मिमी

वैभववाडी – ४१ मिमी

मुळदे – ९३.४ मिमी

रामेश्वर – ११८.८ मिमी

सावंतवाडी – १३० मिमी

देवगड – ५३ मिमी

ठाणे

उल्हासनगर – २१ मिमी

अंबरनाथ- २९ मिमी

ठाणे- २२ मिमी

शहापूर – ४ मिमी

कल्याण – २७ मिमी

मुरबाड – ६२ मिमी

मुंबई

कुलाबा- २९.९ मिमी

सांताक्रूझ – ६२ मिमी

लातूर

चाकूर- ६५ मिमी

लातूर – २१ मिमी

रेणापूर- ८५ मिमी

निलंगा – ३७ मिमी

जालकोट – ३६ मिमी

देवनी- ३१ मिमी

शिरूर -२० मिमी

उदगीर – ४५ मिमी

धुळे

धुळे – ५ मिमी

शिरपूर – ३६ मिमी

साक्री – ४१ मिमी

सिंदखेडा- ३६ मिमी

पिंपळनेर -१० मिमी

नाशिक

नांदगाव -४० मिमी

सुरगाणा – ३५ मिमी

सिन्नर – १२.२ मिमी

येवला – ८ मिमी

पेठ- १९ मिमी

पिंपळगाव- १९.५ मिमी

देवळा – १६.४ मिमी

पुणे

चिंचवड – १०१ मिमी

ढमढेरे – ८५.५ मिमी

हडपसर – ७६ मिमी

वडगाव शेरी – ६७ मिमी

एन डी ए- ६५.५ मिमी

लोणावळा – ५६.५ मिमी

पाषाण – ५४ मिमी

हवेली,लवासा- ४९ मिमी

तळेगाव – ४४ मिमी

गिरिवण- ४२ मिमी

शिवाजीनगर – ४०.५ मिमी

लवाळे- ३५.५ मिमी

राजगुरुनगर – २९ मिमी

माळिन गाव-२८ मिमी

पुरंदर – १७.५ मिमी

निमगिरी- १२.५ मिमी

बालेवाडी, भोर- ६ मिमी

आज पावसाचा अंदाज कुठे

वादळी पाऊस दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्या नगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव

वादळी वारे, विजांसह मुसळधार पाऊस सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट)

मुंबई, ठाणे, पालघर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

महाराष्ट्र किनाऱ्यापासून ७५ किमी बुधवारपासून ते रविवारपर्यंत संपूर्ण किनारपट्टीवर आणि त्याच्या बाहेर ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळेपुढील पाच दिवस मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.