Mumbai News Updates: वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि तिसरी मुंबई यामुळे भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होणार आहे. हे लक्षात घेता द्रुतगती महामार्गाला समांतर आणखी एक द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. तसेच राज्यातील जनतेने २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला होता, पण त्यावेळी चपट्या पायाचे लोक राजकारणात असल्यामुळे त्यांनी हिंदुत्वाशी दगाबाजी केली. त्यामुळे आमचे सरकार येऊ शकले नाही, अशी टीका मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता आज येथे केली. अशा विविध क्षेत्रातील मुंबई, मुंबई महानगर, पुणे -नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi : महत्त्वाच्या घडामोडींची माहिती एका क्लिकवर…
नदीजोड पाण्यासाठी आणखी एक लाख कोटींचे कर्ज… छगन भुजबळ काय म्हणाले ?
मेट्रो २ अ आणि ७: ३९ महिन्यात २० कोटी प्रवाशांचा मेट्रो प्रवास
जपानी तरुणीने लावला ‘हनी ट्रॅप’, अंधेरीच्या वृध्दाची ५२ लाखांची फसवणूक
शहाड रेल्वे स्थानकाजवळ अल्पवयीन चोरट्याच्या फटक्यात नाशिकच्या प्रवाशाने पाय गमावला
कबुतर खान्यावरील कारवाईमुळे जैन समाज भाजपवर नाराज
ऑनलाईन गुंतवणूकीच्या जाहिरातीद्वारे दोन वेळा सायबर फसवणूक, लालबाग येथील रहिवाशाने गमावले २.६ कोटींचा गंडा
बोरिवलीतील तलावात बुडून २० वर्षीय मुलाचा मृत्यू
जनआरोग्य योजना सक्तीचा निर्णय : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह पुण्यातील ११ रुग्णालयांना तूर्त दिलासा
किन्नरची आत्महत्या, प्रियकर रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल
फेसबुक, खेळ आणि १ कोटींचे बक्षिस; वृध्देने गमावले २१ लाख रुपये
पंतप्रधान मोदींकडून नवीन रेल्वे लाईनला मंजुरी, ११ हजार कोटींची मदत; अभिनंदन पत्रांचा वर्षाव
Shashank Ketkar Video: ठाण्यात ढोलताशाच्या सरावावेळी अभिनेता शशांक केतकर यांनी शेअर केला व्हिडिओ; ‘वातावरण तापतंयची’ पोस्ट चर्चेत
” शिवदुर्ग दर्शन प्रकल्पांतर्गत ५१ किल्ल्यांची…”, कोकण विभागीय आयुक्तांनी कोकण पर्यटनबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती
महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे यांच्यासोबत कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी हे उपस्थित होते. सविस्तर वाचा…
” महसूल सप्ताह हा केवळ सात दिवसांचा नाही तर, संपूर्ण वर्षभर…” अपर मुख्य सचिव डॉ.विकास खारगे यांचा सल्ला
ठाणे : महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे हे उपस्थित होते. सविस्तर वाचा…
विनापरवाना गणपती मिरवणूक प्रकरणी गुन्हे; उल्हासनगरातील दोन मंडळांवर गुन्हे दाखल
गणेशोत्सव जवळ येत असतानाच मोठ्या मंडळाकडून गणेश मूर्तींची मिरवणूक काढून मुख्य मंडपात नेण्यासाठी लगबग सुरू आहे. अशातच विनापरवाना मिरवणूक काढून सार्वजनिक रस्ते बंद करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांवर उल्हासनगर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सविस्तर वाचा…
अमेरिकेतील भावाचा हुबेहूब आवाज क्लोन करुन व्यापाऱ्याची फसवणूक
अमेरिकेत असलेल्या भावाचा हुबेहूब आवाज काढून एका व्यापाऱ्याला सायबर भामट्याने फसविले आहे. आजारी असल्याचे कारण देत तातडीने पैसे पाठविण्यास या भामट्याने सांगितले होते. कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) च्या मदतीने आवाज क्लोन करून ही फसवणूक करण्यात आली होती. जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमाशुल्क अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात; दहा लाखांची लाच घेताना अटक
सहार विमानतळावर कार्यरत असलेल्या एका सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधीक्षकाला केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय) १० लाखांची लाच घेताना अटक केली आहे.सीबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सीमा शुल्क विभागाचे (कस्टम) अधीक्षक श्रीकृष्ण कुमार सहार विमानतळाच्या हवाई कार्गो विभाग कार्यरत होता. सविस्तर वाचा…
मुंबई पुणे नागपूर न्यूज ४ ऑगस्ट २०२५