Mumbai News Updates, 16 July 2025 : फेसबुकवर लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती प्रसारित केल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. उत्तराखंडमधील नैनिताल येथे २०२२ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. यापैकी काही चित्रिफिती या वांद्रे येथून अपलोड केल्याचे आढळल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पुढील पाच-सहा महिन्यात होण्याची शक्यता असून वेगवेगळ्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विविध पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नागपूर शहरात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मध्य नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून नोंदणी केल्यानंतर भाडे नाकारल्यास वायुवेग पथकाद्वारे कारवाई केली जाते. नोंदणी केल्यानंर भाडे नाकारल्याप्रकरणी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत एक हजार १५९ ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई केली असून दोन लाख ५८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली.

कल्याणीनगर येथील पोर्शे माेटारीच्या अपघात प्रकरणात संगणक अभियंता तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध खटला चालविण्याचा अर्ज बाल न्याय मंडळाने (जेजीबी) मंगळवारी फेटाळला. या निर्णयामुळे अल्पवयीन मुलाला दिलासा मिळाला आहे.

नागपूर, मुंबई, पुणे या शहरांच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा LIVE BLOG.

Live Updates

Mumbai Pune Nagpur News Live Updates

Pune Mumbai Nagpur Live News Updates in Marathi

16:35 (IST) 16 Jul 2025

टेस्लाचे देशातील पहिले शो रूम मुंबईत, राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे चीनमधून आयात केलेल्या टेस्लाला टोलमाफी

प्रसिद्ध टेस्ला कंपनीच्या मोटारगाड्यांची चीनमधून आयात करण्यात येत असून, देशातील पहिले टेस्ला शो रूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू करण्यात आले आहे. …वाचा सविस्तर
16:23 (IST) 16 Jul 2025

पुण्यातील ‘नदीकाठ सुधार’बाबत न्यायालयाने दिला निर्णय !

महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नदीकाठ सुधार प्रकल्पातील वृक्षतोडीबाबत दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. …सविस्तर बातमी
16:02 (IST) 16 Jul 2025

प्रशासकांचे काम उत्तम! नगरसेवक हवेच कशाला? बुलढाण्यातून अजब मागणी…

पालिकाचे प्रशासक उत्तम काम करीत असल्याने व जनतेच्या समस्या तत्काळ मार्गी लागत असल्याने सदस्यांची गरजच काय? असा अजब सवाल बुलढाणा शहरातील काही युवकांनी केला आहे. …सविस्तर वाचा
15:45 (IST) 16 Jul 2025

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता! अंतिम वर्षासाठी ‘फुल्ल कॅरी ऑन’ लागू

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीमुळे निवड आधारित श्रेयांक प्रणालीत (सीबीसीएस) अंतिम वर्षासाठी प्रवेश पात्रता प्राप्त न करू शकणाऱ्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासात अडथळा निर्माण होणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही अटीविना अंतिम वर्षात प्रवेश देणे आवश्यक होते. …सविस्तर बातमी
15:01 (IST) 16 Jul 2025

बुलढाणा जिल्ह्यात ‘लम्पी’ चा शिरकाव! दोघांना लागण, बैलाचा मृत्यू? पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट मोड’ वर

खान्देश विभागाला लागून असलेल्या व विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर तालुक्यातील दोघा पाळीव जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला असून एका गायी वर मलकापूर येथे उपचार सुरु आहे. …अधिक वाचा
14:50 (IST) 16 Jul 2025

एसटी बस घटल्या, परंतु अपघातात प्रवासी मृत्यू वाढले… राज्यात…

एसटीच्या ताफ्यात ३१ मार्च २०२० रोजी १८ हजार १६१ प्रवासी बसेस होत्या. नंतर सुमारे २ हजार बसेस ‘स्क्रॅप’मध्ये काढण्यात आल्या. त्यामुळे बसेसची संख्या आणखी खाली आली. …वाचा सविस्तर
14:28 (IST) 16 Jul 2025

यूनियन बँकेला मराठीचे वावडे! मराठीतील पोलीस एफ आय आर मान्य नाही, मनसेचे आंदोलन

भाषेपायी अशी संतापजनक अडवणूक नागपूरच्या बोपचे कुटुंबीयांची केली जात आहे. हे वर्तन यूनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेकडून केले जात आहे. …वाचा सविस्तर
14:11 (IST) 16 Jul 2025

विदर्भात आज पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा “येलो अलर्ट”

कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. …सविस्तर वाचा
14:09 (IST) 16 Jul 2025

चंद्रपूर जिल्हा प्रमुख पद विकणे आहे, वरोरा शहरात लागलेल्या फलकाने खळबळ

विशेष म्हणजे ही घटना अशा वेळी उघडकीस आली आहे जेव्हा फक्त एक दिवस आधी, म्हणजे १५ जुलै रोजी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले आहेत. …सविस्तर वाचा
14:07 (IST) 16 Jul 2025

कोल्हापुरी चप्पलची नक्कल करणाऱ्या ‘प्राडा’विरोधातील याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाचा निर्णय

इटालियन फॅशन ब्रॅंण्ड ‘प्राडा’ने कोल्हापुरी चप्पलची नक्कल केल्याच्या आरोपावरून याचिकाकर्ते हे कोल्हापुरी चप्पलचे नोंदणीकृत मालक नाहीत आणि त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे नमूद करून ‘प्राडा’विरुद्ध केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. …वाचा सविस्तर
14:04 (IST) 16 Jul 2025

वनविभागात ऑनलाईन बदलीसाठी न्यायालयाचे आदेश; पारदर्शकतेकडे महत्त्वाचे पाऊल

आता वनविभागातही ऑनलाइन बदली धोरण लागू करण्याच्या दिशेने पाऊल टाकले जाणार आहे. …अधिक वाचा
13:57 (IST) 16 Jul 2025

कोल्हापुरी चप्पलची नक्कल करणाऱ्या ‘प्राडा’ विरोधातील याचिका फेटाळली; उच्च न्यायालयाचा निर्णय

‘प्राडा’ने ‘कोल्हापुरी चप्पल’ची नक्कल करत ‘टो रिंग सैंडल्स’ नावाने उत्पादने बाजारात आणली असून या सँडलची किंमत प्रति जोडी एक लाख रुपये ठेवल्याचा आऱोप याचिकाकर्त्याने केला होता. …सविस्तर वाचा
13:23 (IST) 16 Jul 2025

पालघर : शहरातील सर्वच मुख्य रस्ते खड्ड्यात, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना त्रास

पावसाळा सुरू झाल्यापासून पालघर शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. …सविस्तर वाचा
13:08 (IST) 16 Jul 2025

डोंबिवलीत ‘आरटीओ’च्या रिक्षा वाहनतळांच्या सर्वेक्षणावर रिक्षा संघटनांचा बहिष्कार

हा सर्वे कोणतेही नियोजन नसलेला, प्रवासी हिताचा नसल्याने डोंबिवलीतील प्रमुख रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्वेक्षणाकडे पाठ फिरवून निषेध नोंदवला. …वाचा सविस्तर
13:01 (IST) 16 Jul 2025

Video : बापरे! रस्त्यावर आले पाच फूट लांबीचे अजगर अन् मग…

पावसाचे दिवस सुरु झाल्या पासुन ग्रामीण भागासह शहरात देखील साप घरात कंपाउंड मध्ये शिरल्याच्या घटना वाढत जात आहेत, हेल्प फॉर अनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूर या संस्थेला दररोज असंख्य कॉल येत आहेत. …वाचा सविस्तर
12:26 (IST) 16 Jul 2025

‘शकुंतले’चे पुनरूज्जीवन केव्हा? ब्रॉडगेज प्रकल्प दशकानुदशके प्रलंबित…

फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात ५० टक्के आर्थिक सहभागाची घोषणा राज्य शासनाने केली होती. १२० वर्षांचा इतिहास असलेल्या शकुंतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर विदर्भातील आर्थिक प्रगतीला चालना देऊ शकते. …सविस्तर बातमी
12:25 (IST) 16 Jul 2025

‘शकुंतले’चे पुनरूज्जीवन केव्हा? ब्रॉडगेज प्रकल्प दशकानुदशके प्रलंबित…

फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात ५० टक्के आर्थिक सहभागाची घोषणा राज्य शासनाने केली होती. १२० वर्षांचा इतिहास असलेल्या शकुंतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर विदर्भातील आर्थिक प्रगतीला चालना देऊ शकते. …सविस्तर बातमी
12:12 (IST) 16 Jul 2025

आमचा निकाह झाला, आता सुखाने जगू द्या; मुस्लिम प्रेमियुगुल मुख्यमंत्र्यांच्या ‘गृह’ जिल्ह्यात आश्रयाला

प्रेमाला असलेला विरोध आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण झालेले हे प्रेमियुगुल आहे, राहील शेख आणि रबा महेरोश. …वाचा सविस्तर
12:12 (IST) 16 Jul 2025

अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुक कोंडी

घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्याने झालेल्या अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतुक व्यवस्थेवर झाला आहे. …वाचा सविस्तर
12:12 (IST) 16 Jul 2025

मुंबईतील डॉक्टरांची गडचिरोलीत प्लास्टिक सर्जरीची सेवा!

गडचिरोलीत त्यांनी २७ आणि २८ जून या दोन दिवसांत एकूण २९ प्लास्टिक सर्जरी केल्या, यात १७ लहान मुलांचा समावेश आहे. …अधिक वाचा
12:08 (IST) 16 Jul 2025

मुंबईच्या गजबजाटात राखी धनेशाचं अस्तित्व कायम

अजय नाडकर्णी आणि त्यांची लहान मुलगी अनन्याने छायाचित्रित केले दुर्मीळ क्षण,सतत वाढत जाणारी गर्दी यातही या पक्ष्याने आपला अधिवास न सोडता शहरातील जैवविविधतेचा एक सकारात्मक संदेश दिला आहे. …सविस्तर बातमी
11:42 (IST) 16 Jul 2025

फेसबुकवर अल्पवयीन मुलींच्या ५० अश्लील चित्रफिती… खेरवाडीत दोघांविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलींचा समावेश असलेल्या ५० चित्रफिती (चाईल्ड पोर्नोग्राफी) २०२२ मध्ये फेसबुकवर प्रसारित केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. …अधिक वाचा
11:41 (IST) 16 Jul 2025

एनएसईलाही बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल… गुन्हा दाखल

इमारतीमध्ये चार आरडीएक्स व आईडी ठेवले असून त्याचा स्फोट होणार असल्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. …अधिक वाचा
11:40 (IST) 16 Jul 2025

विलेपार्ल्यात सव्वा कोटींच्या दागिन्यांची चोरी; दोन सराईत गुन्हेगार अटकेत

आरोपींनी घराच्या खिडकीतून प्रवेश करून ही चोरी केली होती. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(१), ३३१(४) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. …वाचा सविस्तर
11:40 (IST) 16 Jul 2025

क्रेडिट कार्ड न वापरता महाविद्यालय प्राचार्याची सायबर फसवणूक

मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नवीन क्रेडिट कार्ड घेतले होते. मात्र त्याचा वापर न करताच त्यांना सायबर फसवणुकीचा फटका बसला. …सविस्तर बातमी
11:40 (IST) 16 Jul 2025

मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदीची कारवाई नको; उच्च न्यायालयाचे महानगरपालिकेला आदेश

महापालिकेची कारवाई ही केवळ मनमानी आणि बेकायदेशीर नाही, तर त्यामुळे कबुतरांची सामूहिक उपासमार आणि संहार होत आहे, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. …सविस्तर बातमी
11:39 (IST) 16 Jul 2025

योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपटाला सीबीएफसी प्रमाणपत्रच नाही; निर्मात्यांची उच्च न्यायलयात धाव

योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ”द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर” या पुस्तकावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी” हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता …सविस्तर वाचा
11:39 (IST) 16 Jul 2025

JNPT 800 Crore Scam : टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्सविरुद्ध सीबीआय चौकशीला उच्च न्यायालयाची स्थगिती

छापे आणि जप्ती पंचनाम्यात गंभीर त्रुटी आढळल्यानंतर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या तपासाला स्थगिती दिली. …वाचा सविस्तर
11:38 (IST) 16 Jul 2025

सतत मोबाइल मागितल्यामुळे संतापलेल्या सावत्र पित्याने केली मुलीची हत्या… गळा आळून मृतदेह समुद्रात फेकला

ॲन्टॉप हिल येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह कुलाबा येथील समुद्रात सापडला असून तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. …अधिक वाचा
11:35 (IST) 16 Jul 2025

संप करावा की करू नये… मुंबई महापालिकेच्या सफाई खात्यातील कामगारांचा आज निर्णय

घरोघरी गोळा केलेला कचरा जमा करण्यासाठी सेवाधारित कंत्राट देण्याचे मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने ठरवले आहे. …सविस्तर बातमी