Mumbai Live Updates, 24 July 2025: मुंबई शहरातील शाळांना धमकीचे ई-मेल येण्याचे सत्र सुरूच असून अलिकडेच कुर्ला येथील आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने शाळेच्या परिसरात अनेक बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता. शाळा प्रशासनाने धमकीच्या या ई-मेलबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातील पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेऊन शाळेची तपासणी केली.

गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या कामकाजाच्या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे वादग्रस्त ठरलेले चित्रीकरण कोणी केले असावे याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने सुरू केली आहे.कोकाटे हे सभागृहाचे कामकाज सुरू असताा दुपारी १.३१ ते १.५१ या काळात भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणली आहे. यावरून कोकाटे हे वादग्रस्त ठरले आहेत. 

या घडामोडींसह मुंबई,  मुंबई महानगर, नागपूर आणि पुणे शहर परिसरातील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या…

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Live Updates in Marathi

11:31 (IST) 24 Jul 2025

‘हडपसर’मधील मतपडताळणी का पडली लांबणीवऱ…आता कोणत्या मतदारसंघाची होणार मतपडताळणी…

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पराभूत उमेदवार, विद्यमान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणुकीच्या निकालासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. …सविस्तर बातमी
11:20 (IST) 24 Jul 2025

कोकाटे यांचे चित्रीकरण कोणी केले? विधिमंडळाची चौकशी सुरू

गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या कामकाजाच्या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे वादग्रस्त ठरलेले चित्रीकरण कोणी केले असावे याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने सुरू केली आहे. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 24 Jul 2025

कोकाटे यांचे चित्रीकरण कोणी केले? विधिमंडळाची चौकशी सुरू

गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या कामकाजाच्या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे वादग्रस्त ठरलेले चित्रीकरण कोणी केले असावे याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने सुरू केली आहे. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 24 Jul 2025

कुर्ला येथील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी… पोलिसांकडून तपास सुरू

शहरातील शाळांना धमकीचे ई-मेल येण्याचे सत्र सुरूच असून अलिकडेच कुर्ला येथील आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. …सविस्तर वाचा
11:13 (IST) 24 Jul 2025

वर्सोवा – भाईंदर प्रकल्पासाठी जमिनींचे वेगाने संपादन करावे…अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या आवश्यक त्या जमिनीचे संपादन वेगाने करावे, तसेच शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. …सविस्तर वाचा

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २४ जुलै २०२५