Mumbai Rain News Updates 29 may 2025 :मोसमी पाऊस बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात दाखल झाला. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाला. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा भागही मोसमी पावसाने व्यापला. त्याचबरोबर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापून मोसमी पाऊस पुढे सरकला आहे. तसेच,इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बुधवारपर्यंत पुणे विभागातील ९७ हजार १७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील ६० हजार २०४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, पहिल्या फेरीचे अर्ज भरण्यासाठी ३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सुनंदा वाखारे यांनी ही माहिती दिली. शिक्षण विभागाने यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशा बातम्यांसह मुंबई, मुंबई महानगरातील तसंच पुणे शहर – परिसर आणि नागपूरमधील विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Latest  News Updates, 29 may 2025

11:06 (IST) 29 May 2025

भाईंदरच्या जोशी रुग्णालयात करोना कक्ष; महापालिकेकडून खबरदारी

राज्यभरात विविध ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर महापालिका सज्ज झाली आहे. …वाचा सविस्तर
11:06 (IST) 29 May 2025

मेट्रोच्या कामादरम्यान अपघाताचा धोका; साहित्याची चढ-उतार करताना खबरदारीकडे दुर्लक्ष

मिरा भाईंदर शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खबरदारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. …सविस्तर बातमी
10:57 (IST) 29 May 2025

देवेंद्र फडणवीसांच्या ‘स्टील सिटी’तील राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बघून नागरिक म्हणाले, ‘हाच का तुमचा विकास?’

गेल्या सहा वर्षांपासून विविध कारणांनी बांधकाम रखडल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी पुन्हा एकदा चर्चेत आहे. …सविस्तर बातमी
10:37 (IST) 29 May 2025

वसई विरार पालिकेचा प्लास्टिक मुक्तीचा संकल्प; कापडी पिशव्यांच्या निर्मितीवर भर

वसई विरार शहरातील वाढता प्लास्टिकचा वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. …सविस्तर बातमी
10:28 (IST) 29 May 2025

‘शालार्थ आयडी’ घोटाळा: आता संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर!

अनेक संस्थाचालकांविरोधात विशेष तपास पथकाकडे(एसआयटी) तक्रारी आल्या असून त्यांचाही तपास केला जाणार आहे. …वाचा सविस्तर
10:18 (IST) 29 May 2025

दारूमुळे कुटुंबात कलह, पत्नी व मुलाने डोक्यावर फावडे मारून केली हत्या

या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. रमे …वाचा सविस्तर
10:04 (IST) 29 May 2025

एपीएमसीची ‘तुंबई’: नालेसफाईचा फज्जा; व्यापाऱ्यांचा संताप अनावर

पहिल्याच पावसात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पूर्णपणे गाळात गेला आहे. एपीएमसीतील कांदा-बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला आणि फळ बाजार या सर्वच विभागांत पावसाने मोठे नुकसान केले आहे. …अधिक वाचा
10:01 (IST) 29 May 2025

बेलापूर पाण्यात घालवणाऱ्यांवर कारवाई कधी? संतप्त व्यापारी, नागरिकांचा सवाल

सोमवारच्या पूरस्थितीमुळे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याने ते संताप व्यक्त करत आहेत, दुसरीकडे या परिस्थितीला जबाबदार ठेकेदार, अभियंत्यांवरील कारवाईबाबत मात्र पालिका स्तरावर मौन आहे. …सविस्तर बातमी
09:54 (IST) 29 May 2025

आपत्ती निवारणासाठी सज्जता;  नवी मुंबई महापालिकेचा स्वतंत्र आपत्कालिन प्रतिसाद दल

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपत्ती निवारणासाठी विभागवार यंत्रणा असून यामध्ये पालिकेचे अग्निशमन दल महत्त्वाची भूमिका बजावते. …वाचा सविस्तर
09:39 (IST) 29 May 2025

पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे कामांवर परिणाम; महापालिका आयुक्त यांची स्पष्टोक्ती

मुसळधार पावसामुळे मुंबईत दोन दिवसांपूर्वी उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी पालिकेच्या पावसाळी कामांचा आढावा घेतला. …सविस्तर बातमी
09:29 (IST) 29 May 2025

चप्पल जप्त करण्यासाठी महिलेला अटक ? नुकतेच बाळ झाल्याने आरोपीला अटकेपासून संरक्षण

अचानक गाडी थांबवल्याच्या कारणावरून दोन महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणी आरोपी असलेल्या महिलेला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. …सविस्तर वाचा
09:24 (IST) 29 May 2025

शेअर मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली ३.६३ कोटींची सायबर फसवणूक; सायबर पोलिसांकडून दोघांना अटक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीतून चांगला परतावा देण्याच्या नावाखाली दहिसर येथील लेखापालाची सुमारे साडे तीन कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. …सविस्तर बातमी
09:06 (IST) 29 May 2025

परदेशी भाज्यांचे दर गगनाला; ब्रोकोली, आईसबर्ग, लेट्युससह झुकिनी महाग

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः भाजीपाल्याचे उत्पादन खराब झाल्याने बाजारात पुरवठा घटला आहे. …वाचा सविस्तर
08:52 (IST) 29 May 2025

तारापूरच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात टँकर बंदी

प्रदूषणाबाबत अटी शर्तींचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होणार कठोर कारवाई …वाचा सविस्तर

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे