Mumbai Breaking News Updates: पुण्यातील वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अद्यापही राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे याला अटक झालेले नाही. पोलिसांची सहा पथक दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळवून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून गेल्या अडीच तासांपासून सुनील चांदिरे नावाच्या व्यक्तीची कसून पोलीस चौकशी सुरू आहे. 

तसेच राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी काही भागांत १०० ते १५० मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूर सह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 22 may 2025

11:09 (IST) 22 May 2025

राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; वैष्णवी आत्महत्या प्रकरण भोवलं!

शुक्रवारी वैष्णवी शशांक हगवणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अवघ्या राज्यभर एकच खळबळ उडाली होती. …सविस्तर वाचा
11:06 (IST) 22 May 2025

राज्यात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ भागात १००- १५० मिमी पावसाची शक्यता…

राज्यात पुढील २४ तासांत कोकण व घाटमाथ्यावर १०० ते १५० मिमीपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा भागांत अतिवृष्टीची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. …वाचा सविस्तर
10:54 (IST) 22 May 2025

१२ कोटी ३९ लाख खर्च करून नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकाचा कायापलट

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील काचेची कलाकृती आकर्षणचे केंद्र ठरली आहे. इतवारी स्थानकाचा कायापालट करण्यासाठी १२ कोटी ३९ लाख रुपये खर्च आला. …सविस्तर बातमी
10:54 (IST) 22 May 2025

आयटीआय संस्था अद्ययावत करायची आहे, पाच हजार उद्योग समूहांना साकडे

राज्यातील ४७२ आयटीआय संस्थांचे अद्ययावत रूपांतर आणि तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व रोजगार मिळावा यासाठी मंगल प्रभात लोढा यांनी आयटीआय दत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उद्योगांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. …अधिक वाचा
10:29 (IST) 22 May 2025

प्रभागरचनेचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, शिवसेनेची (ठाकरे) नगरविकास विभागाकडे मागणी

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, संघटक प्रशांत बधे यांनी या संदर्भातील निवेदन नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. …सविस्तर वाचा
10:24 (IST) 22 May 2025

बेल्जियममधून टपालाद्वारे अमली पदार्थांची तस्करी, मुंबईतून तरूणाला अटक

बेल्जियमहून आंतरराष्ट्रीय टपालाद्वारे मुंबईत एक्स्टसी (एमडीएमए) पाठवले जात असल्याच्या प्रकरणी बोरिवलीतील तरुणाला अटक. सुमारे दोन कोटींचा साठा सीमाशुल्क विभागाने जप्त केला. …वाचा सविस्तर
10:10 (IST) 22 May 2025

राज्य सरकारचा नवा निर्णय… राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी भरती…

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या मंजूर १७९१ पदांच्या सेवा बाह्यस्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जीईएम संकेतस्थळावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. …सविस्तर बातमी
10:01 (IST) 22 May 2025

रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा

पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन राज्य पोलिसांच्या कक्षात येताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. …वाचा सविस्तर
09:53 (IST) 22 May 2025

एनडीए येथे १०३ मिलीमीटर, शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी

एनडीए येथे १०३ मिलीमीटर,मगरपट्टा येथे ५४.५, हडपसर येथे २१.५, तळेगाव येथे १५.५, कोरेगाव पार्क येथे १०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. …वाचा सविस्तर
09:34 (IST) 22 May 2025

राज्यातील ७५० शाळा बंद पडण्याचा धोका, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा दावा

संचमान्यतेचे नवे धोरण रद्द न केल्यास १७ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने दिला. …सविस्तर बातमी
09:18 (IST) 22 May 2025

अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध वडिलांचे पालकत्व दोन मुलींकडे – उच्च न्यायालय

मानसिक आजारामुळे अंथरुणाला खिळलेल्या वडिलांचे पालकत्व त्यांच्या दोन मुलींना उच्च न्यायालयाने सोपवले असून, पॅरेन्स पॅट्रिए विशेषाधिकाराचा वापर करत न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. …वाचा सविस्तर

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे