अकोला: सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष गाडीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

०१०३३ द्विसाप्ताहिक सुपरफास्ट लोकमान्य टिळक टर्मिनसपासून दर मंगळवार आणि गुरुवारी २०.१५ वाजता २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या ११ फेऱ्या होतील. ०१०३४ साप्ताहिक सुपरफास्ट २७ ऑक्टोबर ते ०१ डिसेंबरपर्यंत दर बुधवार आणि शुक्रवारी १३.३० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

हेही वाचा… बापरे! एकाच दिवशी तब्बल १.१३ लाख लोकांचा मेट्रोतून प्रवास

या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर येथे थांबा आहे. एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, पॅन्टरी कार आणि दोन जनरेटर व्हॅन अशी गाडीची रचना राहणार आहे. विशेष शुल्कावर संगणकीकृत आरक्षण केले जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 trips of ltt nagpur bi weekly special train will be made in view of the rush of passengers during the festive season ppd 88 dvr