नागपूर: २४ तारखेला विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात होणाऱ्या गर्दीचा फायदा महामेट्रोला झाला. मंगळवारी एकाच दिवशी मेट्रोतून सुमारे १.१३ लाख प्रवाशांनी प्रवास केला.

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवली होती. या दिवशी सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या दिवशी एकूण १ लाख १२ हजार ९१३ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली. बुधवारी देखील प्रवाशची संख्या वाढत होती. २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवात शहरातील विविध भागात मध्यरात्रीपर्यंत गरबा-दांडिया साजरा करण्यात आला. रात्रीच्या वेळी बहुतांश लोकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास केला.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर

हेही वाचा… गडचिरोली: ओबीसीबहुल २८६ गावे पेसा क्षेत्रातून वगळली

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले आंबेडकरी अनुयायी मेट्रोने जात असल्याचे चित्र होते. वर्धा मार्गावरील खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, उज्ज्वल नगर, जयप्रकाश नगर, छत्रपती नगर, रहाटे कॉलनी, काँग्रेस नगर तसेच झिरो माईल, कस्तुरचंद पार्क, नारी रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची रेलचेल होती. दीक्षाभूमी ते नागलोक आणि ड्रॅगन पॅलेस (कामठी) येथे जाणाऱ्या भाविकांनी मेट्रोने ऑटोमोटिव्ह चौक स्टेशन गाठले आणि पुढील प्रवास रस्त्याने पूर्ण केला. कस्तुरचंद पार्कवरील रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी बर्डीहून नागपूरकर मेट्रोने कस्तुरचंद पार्क स्थानकापर्यंत गेले. प्रत्येक स्थानकावर महामेट्रोने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.

फिडर बससेवा

मेट्रोची सेवा दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दर १० मिनिटांच्या अंतराने आहे. प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत येता यावे यासाठी महामेट्रोने पिपळा फाटा, बेसा, म्हाळगीनगर, नरेंद्रनगर ते छत्रपतीनगर मेट्रो स्टेशनपर्यंत फिडर बस सेवा सुरू केली आहे. याचा फायदा मेट्रो रेल्वे सेवेला होत आहे. एम्समध्ये जाणाऱ्या रुग्णांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी तसेच मिहानमध्ये विविध कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी खापरी मेट्रो स्थानकापासून एम्स आणि मिहानपर्यंत फिडर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक स्थानकावर सायकल आणि ई-रिक्षांची व्यवस्था आहे.