अकोला: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारे मनोज जरांगे पाटील यांची अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. १५० एकरवर त्यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन छेडणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करून सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ दिला. त्यानंतर राज्यभरात दौरा प्रारंभ केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत.

हेही वाचा… बी. टी. देशमुख यांच्या नावे विदर्भातील पहिले सभागृह, कार्याची दखल

मनोज जरांगे पाटील यांचा ‘समाज बांधव गाठी-भेटी दौरा’ सध्या तीन टप्प्यांमध्ये सुरू आहे. या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील ४ डिसेंबरला मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव येथे समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन सायंकाळी शेगाव येथे मुक्काम करतील. त्यानंतर ५ डिसेंबरला अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चरणगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. याच दिवशी वाशीम आणि हिंगोली येथेही त्यांची उपस्थिती राहील. सकल मराठा समाजाच्यावतीने चरणगावात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी सुरू आहे. १५० एकरवर ही सभा होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A public meeting of manoj jarange patil has been organized at charangaon in akola district on december 5 ppd 88 dvr