वर्धा: महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला नवदिशा देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बी. टी. देशमुख होते. आपल्या आयुष्याच्या तीस वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या सभागृहात प्रा. बी. टी. देशमुखांनी शिक्षण विषय प्रश्नांना वाचा फोडून लोकशाही मार्गाने शिक्षण क्षेत्रातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले. अशी कृतज्ञता व्यक्त करीत माजी आमदार व प्राध्यापकांचे नेते प्रा. बी. टी. देशमुख यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज वर्धा येथील सभागृहाचे ‘प्रा. बी. टी. देशमुख सभागृह’ असे नामकरण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जी. भोयर होते. नुटांचे पदाधिकारी डॉ. प्रविण सुर्यवंशी, डॉ. अनिल ढगे, डॉ. रविद्र बेले, प्रा. नितिन कोगरे, प्रा. माने, प्रा. खटोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…

हेही वाचा… अवकाळीचे धुमशान सुरूच, पुसद तालुक्यात पुलावरून पाणी; वाहतूक बंद

यावेळी डॉ. आर. जी. भोयर म्हणाले, प्रा. बी. टी. देशमुख यांनी आपल्या आयुष्यात शहरी भागातीलच नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तसेच प्राध्यापकांच्या समस्या विधीमडंळासमोर मांडून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले. अशा या महान व्यक्तीचे कार्य नवीन पिढीसमोर यावे. हा उदात्त हेतू समोर ठेवून महाविद्यालयाने सभागृहाचे नामकरण त्यांच्या नावे केले ही अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदीप पेटारे यांनी केले. या कार्यक्रमात नागपूर, अमरावती तसेच गोंडवाना विद्यापीठातील नुटांचे सदस्य उपस्थित होते.