Bacchu Kadu Maha Elgar Protest Nagpur : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आज नागपूरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी २२ मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी, अपंग, विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे.

नागपूर रेल्वे स्थानकासह परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी ‘रास्ता रोको’ आणि आता ‘रेल्वे रोको’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी २१ तासांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि आसपासच्या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन आणि रेल्वे विभागाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज उग्र वळण मिळाले आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आज सकाळी समृद्धी महामार्गावर आक्रमक पवित्रा घेत टायर, लाकूड आणि ज्वलनशील साहित्य जाळत आंदोलन छेडले. त्यामुळे काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

कार्यकर्त्यांनी “सरकार जागे व्हा”, “शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे” अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले. या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्यांच्या संख्येमुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण राहिली.

बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र टीका करत म्हटले की, “शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास असे आंदोलन राज्यभर उग्र होईल.” प्रशासनाने शांतता राखावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर नागपूरकडे येणारी आणि मुंबईकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फौज तैनात केली असून, आंदोलन सुरूच असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ट्रॅक्टर–बैलगाडा मोर्चा नागपूरवर धडकला असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. वर्धा मार्गावरील पांजरा वळण रस्त्यावर हजारो शेतकरी मागील दोन दिवसांपासून ठिय्या देऊन बसले आहेत. काल रात्री बच्चू कडू स्वतः शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर झोपले, तर आज सकाळी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.

“उघड्यावरची रात्र आम्हाला नवीन नाही, पण हा अन्याय किती दिवस सहन करायचा? सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहायचं ठरवलंय का? मग तयार राहा — आता भगतसिंगगीरी सुरू होईल!” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला.

या आंदोलनामुळे नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

शेतकरी आंदोलक काल रात्रभर रस्त्यावर झोपले आणि आज सकाळी रस्त्यावर ठिय्या देऊन बसले आहेत त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीची मागणी करत कालपासून नागपुरात ट्रॅक्टर–बैलगाडा मोर्चा धडकला आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी वर्धा मार्गावर पांजरा वळण रस्त्यावर आंदोलन करत आहेत. काल रात्रभर आंदोलक शेतकरी रस्त्यावरच झोपून ठिय्या देत होते, तर आज सकाळीही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.

या आंदोलनामुळे नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा दिशेकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाहतूक ठप्प झाल्याने नागपूर शहरातील महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मिहान आणि जामदाकडे जाणाऱ्यांनाही प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत.