अमरावती : बडनेरा ते वर्धादरम्यान आता ३० रेल्वेगाड्या प्रतितास १३० किलोमीटर वेगाने धावत आहेत. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. यामध्ये एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलची कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. या कामांमुळे मध्य रेल्वेला या बडनेरा ते वर्धा दरम्‍यान ताशी १३० किमी वेगाने रेल्‍वेगाड्या चालवता आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वे सध्या एकूण १२०६.७३ किमी म्हणजे ९५.४४ किमी, इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा मार्गावर ५२६.६५ किमी, पुणे ७५९ किमी असे एकूण १२०६.७३ किमी अंतर कापून १३० किमी प्रतितास वेगाने गाडया चालवत आहे. सुरक्षेच्या सर्व बाबी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केल्यानंतर या गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात बनावट दारूचे तस्कर सक्रीय

वेग वाढविण्‍यात आलेल्‍या एक्‍स्‍प्रेस गाड्यांमध्‍ये लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया सुपर फास्ट द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम सुपर फास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी सुपर फास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा साप्ताहिक सुपर फास्ट एक्सप्रेस, पुणे-संत्रागाची-पुणे साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या कर्मभूमी साप्ताहिक एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हावडा दुरांतो, गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो, लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा टर्मिनस सुपर फास्ट, आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार समरसता द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचा त्‍यात समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badnera to wardha trains are running at 130 km per hour speed mma 73 css