बुलढाणा : जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील बहुतेक लहान, मध्यम धरणे तुडूंब भरली असून त्यातून विसर्ग वाहत आहे.खडकपूर्णा व पेनटाकळी या मोठ्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. नदी पात्रात मोठा विसर्ग सोडण्यात येत असल्याने नदिकाठाच्या पन्नास गावांना पुराचा फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३ पैकी २ मोठे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहे.
संत चोखासागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आज रविवारी देखील मुसळधार पवसाची मुख्यता जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद व छत्रपती संभाजीनगर सिल्लोड या क्षेत्रात मुसळधार पाऊसाची शक्यता सांगितली आहे. त्यानुसार सदर क्षेत्रातून प्राप्त माहिती अन्वये छत्रपती संभाजी नगर जिह्यातील सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
अश्या स्थितीत पाऊसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. यामुळे जलाशय परीचन सूची नुसार प्रकल्पाचा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपत्रात सोडण्यात येत असलेल्या विसर्गात वाढ करण्याची आवश्यकता पडणार आहे. आज रविवारी प्रकल्पचे १९ वक्र दरवाजे १०० सेंटीमीटर ने उघडण्यात आले आहे यामुळे नदीपात्रात मोठा विसर्ग सुरु आहे.
त्यामुळे खडकपूर्णा नदी काठच्या ३३ गावांतील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे.नदी पत्रात गुरे, लहान मुलं, व कोणी मासेमारी तथा नदी पात्रातून वाहतूक करू नये, असा ईशारा पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे. पेनटाकळी धरण ओव्हर फ्लो झाल्याने या मोठ्या धरणाचे ५ दरवाजे २० सेमी ने उघडण्यात आले आहे. मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण जवळपास ९० भरले आहे. यामुळे दमदार पाऊस सुरूच राहिला तर हे धरण तुडूंब भरण्याची दाट शक्यता आहे.जिल्ह्यातील कोराडी, मस, मन, पलढग, उतावळी, ज्ञानगंगा आणि तोरणा हे सातही मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून बहुतेक धरणातून विसर्ग सुरु आहे. यातील मन धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ४१ पैकी बहुतेक लघु प्रकल्प तुडुंब भरले आहे. या प्रकल्पत मिळून ८७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.
येळगावचे ३५ दरवाजे उघडले
पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा शहर आणि १३ गावांना पाणी पुरवठा करण्यात येणारे येळगाव धरण आज ओसांडून वाहत आहे. आज दुपारी धरणाचे ३५ स्वयंचलित गोडबोले गेट उघडले आहे. यामुळे मोठा विसर्ग वाहत आहे.