नागपूर : दक्षिण नागपुरातील मेडिकल चौकातील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयसमोर काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आलीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – गोंदिया : बैलगाडा शर्यतीत सट्टा शौकिनांचा राडा; दगडफेकीसह पोलिसांना धक्काबुक्की

हेही वाचा – वर्धा : अन्नाची टळली नासाडी, भुकेल्यांना मिळाली पुरणपोळी; ‘अनिस’चा समाजोपयोगी उपक्रम

पांडव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या मैत्रीमुळे जनतेची एसबीआय आणि एलआयसीमधील गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी यांनी बनावट कंपन्या स्थापन केल्या आहे. याचे अमेरिकेतील एका संस्थेने पितळ उघडे पाडले. अशाप्रकारे मोदी आणि अदानी यांच्या मैत्रिचे देशातील जनतेला नुकसान सहन करावे लागत आहे. यावेळी रवींद्र भोयर, योगेश गुड्डू तिवारी, सतीश होले, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protest in nagpur against pm modi and adani rbt 74 ssb