लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा: काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच ओबीसी आणि मराठा या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी केला. आज भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आणखी वाचा- कुणबी समाजाचा सरकारविरोधात एल्गार! सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा

जालना येथे मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानंतर जरांगे यांच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण वाढवून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे समर्थन केले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर डॉ. फुके यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासण्याची वेळ आल्याचे फुके यावेळी म्हणाले. दरम्यान, वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाची वकिली करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवालही फुके यांनी केला. वडेट्टीवार यांनी वेळीच त्यांची भूमिका न बदल्यास त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. फुके यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy in obc maratha community due to nana patole and vijay wadettiwar accusation of parinay phuke ksn 82 mrj