चंद्रपूर:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार हे रोखठोक शैलीसाठी परिचित आहेत. त्यांच्या या रोखठोक शैलीचा परिचय मुंबई येथे पार पडलेल्या शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात आला. अजित पवार यांनी गोंडपीपरीचे संवर्ग विकास अधिकारी संजय पुप्पलवार यांना मंचावर बोलावून त्यांची मिशी व फुटबॉल किंग टॅटूचे कौतुक केले. कार्यक्रमातील हा प्रसंगाची सर्वत्र चर्चा आहे.
संवर्ग विकास अधिकारी पुप्पलवार हे प्रेक्षकामध्ये बसले होते. या अधिका-यांच्या मिशीवर अजित पवार यांची नजर पडली. मग काय त्यांनी या अधिका-यांना थेट मंचावर बोलविले. त्यांची आगळीवेगळी मिशी निरखून बघितली.सोबत त्यांच्या हातावरील टॅटयू बघत त्यांच्याशी संवाद साधीत त्यांचे कौतूक केले.अजीत पवारांच्या या अनोख्या स्टाईलने बिडीओ संजय पुप्पलवार हे देखील चकीत राहिले. याची आता जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मुंबई येथील टाटा थीएटर येथे सोमवार २२ सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राज्याचे मुख्यमंत्री अजीत पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सुरवात झाली. गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षीका सुशीला पुरेडडीवार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. हा पुरस्कार घेण्यासाठी त्या आपले पती संजय पुप्पलवार यांच्यासमवेत गेल्या होत्या. संजय पुप्पलवार हे गोंडपिपरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुरस्काराचा कार्यक्रम सुरू झाला. अनं थेट मंचावरून अजीत पवार यांची नजर संजय पुप्पलवार यांच्या मिशीवर पडली.पुप्पलवार यांच्या मिशीची स्टाईल ही खास असल्याने ती लक्षवेधी ठरली होती.
मग कायं.दादाने थेट बिडीओ पुप्पलवार यांना मंचावर बोलाविले. त्यांच्यासोबत दादा भुसे देखिल होते. पुप्पलवार मंचावर जातात.अजीतदादांनी त्यांची मिशी अगदी निरखून बघितली.अनं या आगळयावेगळया मिशीचे भरभरून कौतूक केले. सोबतच पुप्पलवार यांच्या हातावर असलेल्या फुटबाॅल किंग च्या टॅटयूलाही पसंती देत त्यांच्याकाही संवाद साधला. या प्रसंगानंतर आता त्यांच्या या मिशीचीच चर्चा सुरू झाली आहे.‘‘मुछे होतो तो नथ्थुलाल जैसी’’.वरना ना हो.
शराबी चित्रपटातील अमीताभ बच्चन यांचा हा डाॅयलाॅग चांगलाच गाजला होता.आता अजीतदादांनी एका अधिका-याच्या आगळयावेगळया मिशीचे कौतूक भर मंचावर बोलावून केल्याने याची जोरात चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी आपल्या मिशीचे कौतूक केल्याने आपण जाम खुष असल्याची प्रतिक्रिया बिडीओ संजय पुप्पलवार यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या वर्तुळात देखील पुप्पलवार यांच्या मिशीची चर्चा आहे.