राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गट आणि भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवण्यासंदर्भातील प्रश्नावर भाष्य केलं आहे. नागपूरमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधताना काल मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीस यांनी हे विधान केलं.

नक्की पाहा >> मध्यरात्री ‘मातोश्री’वरुन फडणवीसांचा फोन, अडीच मिनिटांची बंद खोलीतील भेट अन्…; अमित शाहांनी सांगितला युती तुटल्याचा घटनाक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीमध्ये शाह यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहून, भाजपा-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. तर फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढण्याचे आवाहन केलं. याचवरुन पत्रकारांनी नागपूर विमानतळाबाहेर फडणवीस यांना प्रश्न विचारला.

“कुठलीही निवडणूक लढत असताना ती आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे असा विचार करुन तुम्ही स्वत:ला झोकून देता तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते. हे केवळ मुंबई महानगरपालिकेसंदर्भात नव्हतं तर एकूणच निवडणुकीच्या नियोजनाबद्दल होतं,” असं फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> “भाजपा आणि शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट, आम्ही…”; अमित शाहांच्या ‘भुईसपाट करा’ विधानानंतर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

“शिंदे गट आणि मनसे एकत्र लढणार मुंबईत भाजपाच्या सोबतीने अशा चर्चा सुरु आहेत,” असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता फडणवीस यांनी या सर्व प्रसारमाध्यमांच्या मनातील चर्चा असल्याचं म्हटलं. “मला देखील खूप मजा येते जेव्हा मी तुमची पतंगबाजी पाहतो. ज्याला जे मनात येईल तो ते दाखवतो. ज्याला जे मनात येईल तसं तो इंटरप्रिटेशन करतो,” असं फडणवीस शिंदे गट, भाजपाच्या मनसेसोबत युतीसंदर्भातील प्रश्नावर म्हणाले.

“तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, भाजपा आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे गट, आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on bjp eknath shinde group alliance with raj thackeray mns for bmc election scsg
First published on: 06-09-2022 at 15:54 IST