RSS Centenary Celebration: नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आज सकाळी ७.४० वाजता संघाच्या ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांच्या सांचलनाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास संचालन सुरू होते. सामूहिक गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित यांची उपस्थिती लक्षणीय होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा अधिक उत्साहात साजरा होणार असून, नागपूरच्या रेशीमबाग मैदानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन आणि मुख्य संबोधन होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. या पथसंचलनात शेकडो स्वयंसेवक पारंपरिक गणवेशात सहभागी झाले आहेत. या प्रसंगी देशभरातील वरिष्ठ स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, घाना, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड आणि अमेरिका येथील काही नागरिक देखील संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदू समाजात जागरूकता आणि सशक्तीकरण यावर भर दिला जाणार आहे. विजयादशमी दिनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभराव्या वर्षानिमित्त यंदाचा विजयादशमी सोहळा विशेष महत्त्वाचा आहे. आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून, यंदाचे हे शताब्दी वर्ष असल्यामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप देण्यात आले आहे. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. विशेष म्हणजे, संघाने यंदा काँग्रेस पक्षातील काही प्रमुख नेत्यांनाही या सोहळ्यासाठी औपचारिक निमंत्रण पाठवले होते.

दरम्यान, संघाच्या या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण मुख्य आकर्षण असणार आहे. यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांच्या भाषणात संघाची आगामी दिशा, सामाजिक कार्याचा आराखडा आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरील भूमिका अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष नागपूरच्या या सोहळ्याकडे लागले आहे.

देशभरात सध्या संघाच्या सुमारे ८३ हजार शाखा नियमितपणे कार्यरत आहेत. याखेरीज आठवड्यातून एकदा होणाऱ्या ३२ हजार बैठका आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदू समाजात जागरूकता आणि सशक्तीकरण यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय बाल स्वयंसेवकांचे स्वतंत्र पथसंचलनही आयोजित करण्यात येणार आहे. देशभरात सध्या संघाच्या सुमारे ८३ हजार शाखा नियमितपणे कार्यरत आहेत. याखेरीज आठवड्यातून एकदा होणाऱ्या ३२ हजार बैठकांद्वारे संघाची वैचारिक आणि सामाजिक चळवळ अधिक बळकट होत असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.