Nagpur Rain Breaking News Today, 9 July 2025: मागील दोन – तीन दिवसांपासून कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. विदर्भातही अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरातही बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात गेल्या ६० तासांपासून सतत पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी देखील सुरूच आहे. यादरम्यान पावसाने एकदाही विश्रांती घेतली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजेपर्यंत या कालावधीत जिल्ह्यात सुमारे १७२.२ मिलिमिटर पाऊस पडला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक रस्ते, महामार्ग बंद करण्यात आले. तसेच गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून ताज्या घडामोडी, बातम्या जाणून घ्या.
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
मुख्यमंत्र्यांचे शहर बनतेय मध्य प्रदेशातील चोरांचा गड, आणखी एक घरफोड्यांची आंतरराज्यीय टोळी जाळ्यात
Bhandara Rain Updates: भंडारा जिल्ह्यातील तब्बल ८० मार्ग बंद, अनेक गावांना पुराचा वेढा
खारघर दारूबंदीचा निर्णय महिलांच्या मतदानावर अवलंबून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत स्पष्ट भूमिका
शाडू मातीच्या निर्णय धरसोडीचा पारंपरिक मूर्तिकारांवर परिणाम
Chandrapur Rain News: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे धुमशान, नदी-नाले तुडुंब, अनेक मार्ग बंद
Nagpur Rain Latest News: नागपूर जिल्ह्यात २४ तासांत २०२.४ मिलिमीटर पाऊस, शहरासह ग्रामीण भागात परिस्थिती बिकट
Nagpur Rain News: नागपुरात पावसाचा तडाखा… जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर…
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ९ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश काढले.
Wardha Rain News: पावसामुळे सुट्टी जाहीर; हिंगणघाटची दैना, भ्रष्ट कामांची थेट गडकरींकडे तक्रार
सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात ठाण मांडणाऱ्या पावसाने शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे.
Nagpur Rain Updates : नागपूर जिल्ह्यात पुलावर पाणी… एसटीच्या चार बस अडकल्या… प्रवासी…
माळणी येथील गावाला लागून असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तूडका ते नागपूर अंभोरा ते नागपूर तसेच उमरेड आगाराच्या तीन बसेस पलीकडे थांबून आहेत.
Nagpur Rain Updates : नागपूर ६० तास जलमय; मुसळधार पावसाने रचला नवा विक्रम!
जून महिना जवळजवळ कोरडाच गेला, पण जुलै महिन्यात पावसाने जोरदार सुरुवात केली.
Nitin Gadkari National Highway: नितीन गडकरींच्या विभागाचा आणखी एक विक्रम! राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल ६ महिन्यांत खचला!
अग्रवाल ग्लोबल कंपनीने जवळपास अंदाजे पाच वर्षांमध्ये या उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण केले.
पावसामुळे बिळाबाहेर आले साप; नागपूरमध्ये तेरा दिवसांत बारा जणांना सर्पदंश
पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर बिळात पाणी गेल्यामुळे साप बाहेर निघतात. विशेषतः ग्रामीण भागात साप अधिक दृष्टीस पडतात.
नागपूर : नरसाळा परिसरात पूर, पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बोटीने…
नागपुरातील नरसाळा स्मशानभूमी जवळ नाल्यांना पूर आला. त्यामुळे नरसाळा परिसरातील खोलगट भागात चांगलेच पाणी शिरले आहे.
Nagpur Rain : नागपूर शहरातील अनेक भाग पाण्यात
सततच्या पावसामुळे शहरातील रस्ते तलावात रूपांतरित होत आहेत.
Video: धक्कादायक! पाहिल्याच पावसात रस्त्यावरचा पूल गेला वाहून, भंडारा जिल्ह्यात…
पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्यावरील निकृष्ट बांधकाम केलेला पूल खचला आणि प्रवाहात वाहत गेला.
Gadchiroli Flood News: गडचिरोलीत पुरामुळे हाहाकार! दोन राष्ट्रीय महामार्गांसह १५ मार्ग बंद, मजूर वाहून गेला
गडचिरोली ते आरमोरी आणि गडचिरोलो ते चामोर्शी या दोन ३५३ राष्ट्रीय महामार्गसह १५ मार्ग बंद झाले आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज ९ जुलै २०२५