नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरात एका महिलेने न्यायालयात एका विनयभंगाच्या आरोपीविरोधात साक्ष देऊ नये म्हणून तिला घाबरवण्यासाठी आरोपीने महिलेचा चक्क वेगवेगळ्या पद्धतीने विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरफराज तनवीर शेख सत्तार (४०) रा. लकडगंज असे आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मी (बदललेले नाव) असे ३७ वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे. लक्ष्मीचा आरोपी शरफराज याने यापूर्वीही एकदा अश्लिल चाळे करत विनयभंग केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात महिलेने आरोपीविरूद्ध न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून २० ऑक्टोंबर २०२३ पासून ३ एप्रिल २०२४ पर्यंत आरोपी सातत्याने महिलेला त्रास देणे सुरू केले.

हेही वाचा…निवडणुकीत ‘लक्ष्मी’ स्वीकारा आणि मतदान करा, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

आरोपीने महिलेला घाबरवण्यासाठी ती घरी असतांना दगडाने तिच्या घरातील खिडकीचे काच फाडत होता. सातत्याने महिलेमध्ये भिती निर्माण करण्यासाठी तिचा पाठलाग करत होता. बदनामीची धमकी देण्यासाठी वारंवार महिलेच्या घरा जवळच्या भिंतीवर घाणेरडे लिहून ठेवत होता. वारंवार लक्ष्मीच्या घराजवळ जाऊन अश्लिल इशारे करून तिला जिवे मारण्याची धमकीही देत होता. आरोपीची हिंमत वाढतच असल्याचे बघत तिने शेवटी लकडगंज पोलीस ठाणे गाठून पुन्हा आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा…वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कधी?

सदर आरोपी त्रास देत असल्याने महिलेने प्रथम २०२३ मध्ये त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. आरोपीवर गुन्हा दाखल करून कारवाई झाली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना पुन्हा हा आरोपी महिलेने या प्रकरणात न्यायालयात त्याच्याविरोधात तक्रार होऊ नये म्हणून सर्रास महिलेला त्रास देत होता. त्यामुळे पोलिसांचा असल्या प्रकारच्या गुन्हेगारांवर वचक कधी राहणार? हा प्रश्न नागपुरातील नागरिक विचारत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur woman harassed and intimidated by accused to not give testimony against him in molestation case mnb 82 psg