नागपूर : एकदिवसीय विश्वकपच्या अंतिम सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधीपक्षाने लक्ष्य केले आहे. मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ असतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : …तर आशा वर्कर पुन्हा संपावर जाणार! सीआयटीयू म्हणते…

हेही वाचा – भंडारा : अजित पवारांच्या भाषणादरम्यान ‘प्रहार’चा गोंधळ, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ‘खुर्च्या खाली करा’ची घोषणा

वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, नरेंद्र मोदी व भाजपा हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यालाही मोदी त्यांच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले. मात्र, वर्ल्डकपमधील सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला. भारतीय संघ जिंकला असता तर त्याचे श्रेय मात्र मोदी व भाजपाने घेतले असते हे जगजाहीर आहे. मोदी जेथे जातात तेथे पराभव होतो. त्यांना नशीब व प्रभू रामही साथ देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticizes narendra modi over cricket world cup rbt 74 ssb